Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने गाठलं अलिबाग! स्विमिंगपूलमध्ये पोहण्याची स्पर्धा अन् पापलेटवर मारला ताव, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 16:24 IST

अलिबागमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमचं व्हॅकेशन, कामातून वेळ काढत कलाकारांची फूल धमाल!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे. या शोमधून विनोदवीर प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. अफलातून अभिनय आणि विनोदाची सांगड घालत हे हास्यवीर प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. हास्यजत्रेतील कलाकारांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. नुकतंच अभिनेत्री वनिता खरातचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने वनिताने सगळ्यांना खास पार्टी दिली. 

वनिताने अलिबागमध्ये छोटं व्हॅकेशन प्लॅन केलं होतं. वनिता खरातबरोबर पती सुमीत, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, मंदार मांडवकर, ईशा डे, शिवाली परब, रोहित माने, निखिल बने, रसिका वेंगुर्लेकर, ओंकार राऊत, पृथ्विक प्रताप यांनी अलिबाग गाठलं. अलिबागमधील एका व्हिलामध्ये हास्यजत्रेची ही मंडळी थांबली होती. हास्यजत्रेच्या कलाकारांनी वनिताचा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याबरोबरच मज्जा मस्तीही केली. 

अलिबाग ट्रिपचा व्हिडिओ वनिताने तिच्या युट्यूब चॅनेलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत अलिबागसारख्या निसर्गरम्य ठिकाणी हास्यजत्रेचे कलाकार एन्जॉय करताना दिसत आहेत. ईशा, वनिता आणि रोहित माने यांच्यामध्ये स्विमिंगपूलमध्ये पोहण्याची स्पर्धा लावल्याचं पाहायला मिळत आहे. तर पापलेट, सुरमईवर या कलाकारांनी ताव मारल्याचं व्हिडिओत दिसत आहेत. 

हास्यजत्रेच्या कलाकारांनी अलिबागमध्ये धमाल केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यांच्या मज्जा मस्तीचे काही क्षण हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हास्यजत्रेतील कलाकारांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी ही मजेशीर कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारवनिता खरातमराठी अभिनेता