Join us

'ही तर सलमानची बहीणच वाटते'; वनिताचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं आर्पितासोबत तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 20:00 IST

Vanita kharat: वनिताने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना अर्पितासोबत केली आहे.

वनिता खरात (vanita kharat) हे नाव आता कोणत्याही प्रेक्षकवर्गाला नवीन नाही. मराठीसह बॉलिवूडमध्येही तिने तिच्या नावाचा डंका वाजवला आहे. त्यातच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर ती प्रत्येक आठवड्याला प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. यामध्ये वनिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात नेटकऱ्यांनी तिची तुलना अर्पिता खानसोबत केली आहे.

अलिकडेच तिने आणि हास्यजत्रेच्या टीमने ऑस्ट्रेलिया दौरा केला. या दौऱ्यातील एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून तिचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना चक्क सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान हिच्यासोबत केली आहे.

वनिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अभिनेता ओंकार राऊत (onkar raut) याच्यासह दिसून येत आहे. या जोडीने अक्षय कुमारच्या 'तू चीज बडी है मस्त' या गाण्यावर डान्स केला आहे. मात्र, या गाण्यातील वनिताचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना अर्पिता खानसोबत (arpita khan) केली आहे.

दरम्यान, वनिताने महाराष्ट्राची हास्यजत्रासोबतच कबीर सिंह या बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. तसंच तिने सुंदरी या मालिकेतही खलनायिकेची भूमिका साकारली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारवनिता खरातसलमान खानअर्पिता खान