Join us

ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर वनिता खरातचा मराठमोळा स्वॅग! म्हणते, "परदेशात साडी नेसून फिरण्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 11:52 IST

वनिताने ऑस्ट्रेलियातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसून मराठमोळा साज केल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणाऱ्या मराठमोळ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री वनिता खरात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी वनिता गुणी अभिनेत्री आहे. अफलातून विनोदबुद्धीच्या जोरावर वनिता प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून वनिता सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही वनिता शेअर करत असते. 

महाराष्ट्राचा लाडका शो असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचा नुकतात ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला. हास्यजत्रेच्या टीमने ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. हास्यजत्रेच्या कलाकारांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये वनिताच्या एका व्हिडिओने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनिताने ऑस्ट्रेलियातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसून मराठमोळा साज केल्याचं पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर मराठमोळ्या स्वॅगमध्ये वनिता फिरताना दिसत आहे.  हा व्हिडिओ शेअर करत वनिता म्हणते, "परदेशात साडी नेसून फिरण्यात एक वेगळीच मज्जा आहे". तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

वनिता खरात अनेक मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. 'सुंदरी', 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकांमध्ये वनिता झळकली आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' सिनेमातील पुष्पा या पात्रामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. 

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार