Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ramayan: रणबीरच्या 'रामायण' मध्ये आणखी एका 'कपूर' अभिनेत्याची एन्ट्री, सुरु केली रिहर्सल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:39 IST

रामायण सिनेमाच्या क्रू मध्ये आणखी एक 'कपूर' सामील झाला आहे. कोण आहे तो?

 नितेश तिवारींच्या आगामी 'रामायण' (Ramayan) सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारत आहे. याशिवाय रामायणातील इतर भूमिकांसाठी अनेक कलाकारांना कास्ट करण्यात आलं आहे. दरम्यान रामायण सिनेमाच्या क्रू मध्ये आणखी एक 'कपूर' सामील झाला आहे. कोण आहे तो?

'रंग दे बसंती', 'आजा नच ले','लव्ह शव्ह ते चिकन खुराना' या सिनेमांमध्ये दिसलेला अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) आठवतोय का? कुणाल बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब होता. आता त्याला कमबॅकमध्येच 'रामायण'सारखा प्रोजेक्ट मिळाला आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, कुणाल कपूर सिनेमातील एका भूमिकेसाठी फायनल झाला आहे. त्याच्या कॉस्च्युम ट्रायललाही सुरुवात झाली आहे. मात्र नक्की त्याची कोणती भूमिका असणार हे अजून समोर आलेलं नाही. अभिनेत्याने सिनेमासाठी तयारीही सुरु केली आहे. सध्या तो स्क्रीप्ट रिहर्सल करत आहे. 

कुणाल कपूरचा शेवटचा सिनेमा हा २०२१ मध्ये आला होता. 'अनकही कहानिया' असं त्याचं नाव होतं. यानंतर तो कुठेच दिसला नाही. 'रामायण'च नाही तर पुढच्या वर्षी त्याचा तेलुगु सिनेमा 'विश्वंभरा'ही रिलीज होणार आहे. कुणाल कपूर हा बिग बी अमिताभ बच्चन यांचा जावई आहे. बच्चन यांची पुतणी नैनाचा तो नवरा आहे. 

नितेश तिवारींचा 'रामायण' दोन पार्टमध्ये बनत आहे. दोन्ही पार्ट 350 दिवसात शूट केले जाणार आहेत. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सिनेमा पूर्ण होईल असा अंदाज आहे. सिनेमात रणबीर, साई पल्लवी यांच्याशिवाय यश, सनी देओल, लारा दत्ता, अजिंक्य देव यांच्याही भूमिका आहेत. आता कुणालचंही यात नाव जोडलं गेलं आहे.

टॅग्स :कुणाल कपूररामायणरणबीर कपूरबॉलिवूडसाई पल्लवीसिनेमा