Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गरोदर असताना त्यांनी मला..."; कुमार सानूच्या Ex पत्नीचा खळबळजनक खुलासा, वाचून डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:20 IST

कुमार सानूची ex पत्नी रिटा भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत गायकाच्या आयुष्याची काळी बाजू सर्वांसमोर उघड केली आहे.

गायक कुमार सानू यांच्या पहिल्या पत्नी रीटा भट्टाचार्य यांनी एका पॉडकास्टमध्ये कुमार सानू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रीटा यांनी सांगितले की, कुमार सानू यांना घटस्फोट हवा होता आणि त्यांना कोणतीही पोटगी किंवा आर्थिक मदत द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी रीटा यांना धमकावण्यासाठी 'अंडरवर्ल्ड'च्या लोकांची मदत घेतली, असा धक्कादायक खुलासा रीटा यांनी केला आहे. कुमार सानूंनी रीटाला दिलेली धमकी 

रीटा भट्टाचार्य फिल्मी विंडोला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक खुलासा केला. रीटा म्हणाल्या, ''कुमार सानूने मला गुंडांकडून धमकी दिली. पण धमक्या मिळूनही मी घाबरले नाही, कारण माझा देवावर विश्वास होता. मी घटस्फोट द्यावा म्हणून त्याने हे गुंड पाठवले होते. त्यासाठी कुमारला मला कोणतीही आर्थिक मदत द्यायची नव्हती. त्याने माझ्या पाठीमागे जे गुंड पाठवले होते, त्यापैकी काही आजही सक्रीय आहेत. ज्या माणसाने माझी आणि माझ्या मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी केली, त्याचं वाईट होईल.''

याच पॉडकास्टमध्ये रीटा यांनी पुढे सांगितलं की, ''कुमार सानू गरोदर असताना मला कोर्टात घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांचं दुसरं अफेअरही सुरू होतं, ज्याचा खुलासा मला आज झाला. आणि मी गरोदर असतानाही मला तो कोर्टात फरफटत घेऊन गेला? मी तेव्हा खूप लहान होते, मला असं वाटलं की, माझं संपूर्ण जग संपलं आहे. माझं कुटुंब खूप दुःखात होतं. मला कधीच कारण कळलं नाही. कुमार सानू कोर्टामध्ये माझ्यावर हसून माझी खिल्ली उडवत होता. फक्त मरण्यापूर्वी माझ्या तिन्ही मुलांना घेऊन मला कुमार सानूला विचारायचंय, मी असं काय चुकीचं केलं होतं?'

टॅग्स :कुमार सानूबॉलिवूडलग्नघटस्फोट