Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 11:18 IST

Kuch kuch hota hai: 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणीने टीना ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे ही भूमिका प्रचंड गाजली.

९० च्या काळात बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती झाली. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे कुछ कुछ होता हैं. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बराच गाजला. या सिनेमात अभिनेत्री राणी मुखर्जीने टीना ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. परंतु, राणी या भूमिकेसाठीची पहिली पसंती नव्हती. तिच्यापूर्वी तब्बल आठ दिग्गज अभिनेत्रींना ही भूमिका ऑफर झाली होती. परंतु, ऐनवेळी राणीला या सिनेमासाठी फायनल करण्यात आलं.

टीनाच्या भूमिकेसाठी 8 अभिनेत्रींनी दिला नकार

‘राणी मुखर्जीला ही भूमिका ऑफर होण्यापूर्वी जवळपास 8 लोकप्रिय अभिनेत्रींना या सिनेमाची ऑफर मिळाली होती. मात्र, प्रत्येक अभिनेत्रीने काही ना काही कारण देत ही भूमिका करण्यास नकार दिला. एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक करण जोहर याने स्वत: याविषयी खुलासा केला होता.

"राणीपूर्वी मी ८ अभिनेत्रींना या भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र, प्रत्येकीने काही ना काही कारणं देत नकार दिला होता. त्यामुळे आता जर या सिनेमासाठी कोणीच मिळालं नाही तर मलाच स्कर्ट घालून रोल करावा लागतोय की काय असंच मला वाटू लागलं होतं. पण, त्याच काळात शाहरुख आणि आदित्य चोप्रा यांनी मला राणी मुखर्जीचं नाव सुचवलं होतं. त्यावेळी राणी गुलाम सिनेमाचं शूट करत होती. मी जरा घाबरतच तिच्याकडे गेलो आणि या सिनेमाविषयी विचारलं. विशेष म्हणजे तिने लगेच होकार दिला", असं करणने सांगितलं.

दरम्यान, टीनाच्या भूमिकेप्रमाणेच करणला सलमान खानने साकारलेल्या भूमिकेसाठीही बरीच मेहनत करावी लागली होती. या सिनेमात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या.

टॅग्स :बॉलिवूडकाजोलराणी मुखर्जीकरण जोहरसिनेमाशाहरुख खान