Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:25 IST

द फाईट इज ऑन! आता व्हिक्टिम कार्ड खेळायचं नाही..., मराठी सिनेसृष्टीला मोलाचा सल्ला देणारी क्षितीज पटवर्धनची पोस्ट

एकीकडे ५ डिसेंबरला 'धुरंधर' हिंदी सिनेमा रिलीज झाला जो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. नंतर आला हॉलिवूडचा 'अवतार'. अशातच १२ डिसेंबरला रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा 'उत्तर'हा मराठी सिनेमा आला. विशेष म्हणजे 'धुरंधर'च्या लाटेत 'उत्तर'सिनेमालाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. लेखक क्षितिज पटवर्धनचा हा पहिलाच दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे. अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं तर प्रचंड कौतुक होत आहे. हिंदीच्या तुलनेत आपला मराठी सिनेमा शोज कमी असूनही टिकून आहे आणि अजूनच वाढतोय याबद्दल क्षितिज पटवर्धनने लक्षवेधी पोस्ट लिहिली आहे.

क्षितिज पटवर्धनचं अप्रतिम लेखन वेळोवेळी दिसून येतंच. आता तर त्याने दिग्दर्शनातही कमाल केली आहे. 'उत्तर'हा उत्कृष्ट सिनेमा तो घेऊन आला आहे. याबद्दल त्याने पोस्ट करत लिहिले, "यापुढे मराठी मार खाणार नाही! चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर' आणि चार पाच वर्षातून एकदा येणार ग्लोबल फेनॉमेना 'अवतार' यांच्या सोबत माझा पहिला सिनेमा 'उत्तर' प्रदर्शित झाला. 'धुरंधर' ने रणवीर च्या कॉंट्रोव्हर्सी नंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला. बावीस बावीस शोज होते. अशावेळी पहिला सिनेमा घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून मी सगळ्यात आधी ठरवलं कि व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही! शोज मिळत नाही अशी आजिबात तक्रार करायची नाही, मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही. उलट जिथे शोज मिळतील ते कसे चालतील याकडे लक्ष द्यायचं."

तो पुढे लिहितो, "१२ ला सिनेमा रिलीज झाला ज्याला शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला, पण तेव्हाच वाटलं की सिनेमा १९ ला रिलीज होतोय असं ट्रीट करूया आणि आणखी लोकांपर्यंत पोचवुया. मग कोल्हापूर, पुणे, आज मुंबई, वेगवेगळी कॉलेजेस, स्पर्धा, समारंभ इथे उपस्थिती लावली, सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवली. परीक्षणं अप्रतिम आली, वीकडेज ला सुद्धा शहरी सेंटर्स मध्ये चांगली ऑक्युपन्सी होती. एशियन फेस्टिव्हल ला सिलेक्शन झालं. बुक माय शो वर अप्रतिम रेटिंग आलं. दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ. यात मराठी माध्यमं खूप उत्तम सपोर्ट करतायत. आमच्याकल्पनांची दखल घेतायत. आज दुसरा विकेंड आहे आणि ६ ठिकाणी शोज वाढले आहेत. अवतार चे रिव्ह्यूज मिक्स्ड आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशा वेळी 'मराठी फॅमिली फिल्म' म्हणून 'उत्तर' चं पोझिशनिंग केलं, ज्याला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय! अशी वेळ या आधी आणि या पुढे अनेक मराठी सिनेमावंर येणार आहे, तेव्हा स्वतःच्या कन्टेन्ट वर विश्वास ठेवून, व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने, आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोचवावा लागणार आहे. एवढचं वाटलं कि या सगळ्यात एक मेसेज जाणं गरजेचं होतं कि कितीही मोठा हिंदी आणि इंग्लिश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन!!"

English
हिंदी सारांश
Web Title : 'Uttar' releases alongside 'Dhurandhar'; Kshitij Patwardhan's noteworthy post.

Web Summary : Kshitij Patwardhan's directorial debut, 'Uttar', released alongside big films, receiving a good response. Despite fewer shows than Hindi films, it's gaining popularity. Patwardhan emphasizes believing in content and avoiding victim narratives, positioning 'Uttar' as a family film amid tough competition, showcasing the resilience of Marathi cinema.
टॅग्स :मराठी चित्रपटधुरंधर सिनेमाअभिनय बेर्डेमराठी अभिनेता