Join us

KIFF 2023 : सलमान खान, सौरव गांगुलीसोबत ममतांचा डान्स; अनिल कपूर, सोनाक्षीही थिरकताना दिसले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 23:04 IST

या चित्रपट महोत्सवातून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात सलमान आणि महेश भट्ट यांनी ममता बॅनर्जी यांना समोर येण्याची विनंती केली आणि नंतर सर्वांनी डान्स केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी पोहोचल्या होत्या. याशिवाय, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, अनिल कपूर, महेश भट्ट, शत्रुघ्न सिन्हा आणि सौरव गांगुलीही या कार्यक्रत सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावर सलमान खानने दीप प्रज्वलन करत सर्वांना हात जोडून अभिवादन केले. 

सलमान खान, अनिल कपूर सोबत ममतांचा डान्स -या चित्रपट महोत्सवातून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात बॅकग्राउंडला अरिजीत सिंगने गायलेले एक बंगाली गाणे वाजत आहे. या वेळी सलमान आणि महेश भट्ट यांनी ममता बॅनर्जी यांना समोर येण्याची विनंती केली आणि नंतर सर्वांनी डान्स केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याशिवाय, या व्हिडिओमध्ये पुढे सलमान 'हुड हुड दबंग'च्या स्टेप्स फॉलो करतानाही दिसत आहे. तसेच सौरव गांगुली बाजूला उभाराहून टाळी वाजवताना दिसत आहे.

12 डिसेंबरपर्यंत चालणार महोत्सव - हा कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 12 डिसेंबरपर्यंत चालेल. कोलकात्यातील नेताजी इंडोर स्टेडियममध्ये या महोत्सवाचे उद्गाटन झाले. सलमान खान येथे पोहोचल्यानतंर, सिंगर आणि नेते बाबुल सुप्रियो यांनी त्याचे स्वागत केले. 

टॅग्स :ममता बॅनर्जीसलमान खानसौरभ गांगुलीमहेश भटसोनाक्षी सिन्हाअनिल कपूरबॉलिवूड