Join us

Video: निरमा पावडरच्या जाहिरातीला करिश्मा कपूरने दिला नवा टच; 90s जाहिरात केली रिक्रिएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 15:35 IST

Karisma kapoor: करिश्मा पूर्वीच्या जाहिरातीप्रमाणे गाडीतून उतरते आणि दुकानात जाते. तिला पाहिल्यावर लगेच दुकानदार तिची सामानाने भरलेली पिशवी तिच्यासमोर ठेवतो.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर करिश्माने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या करिश्माचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे.मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यामध्येच तिने 90sच्या काळात लोकप्रिय ठरलेली निरमाची जाहिरात रिक्रिएट केली आहे.

करिश्माने तिच्या जाहिरातीचा नवा व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा 90 च्या काळात नेलं आहे. ३० वर्षांपूर्वी निरमा सुपर डिटर्जेंटची जाहिरात विशेष लोकप्रिय झाली होती. या जाहिरातीत दिपीका चिखलिया (Deepika Chikhalia) झळकली होती. त्यानंतर आता हीच जाहिरात करिश्माने रिक्रिएट केली आहे. परंतु, यावेळी तिने साबण किंवा डिटर्जेंट पावडरची जाहिरात केली नसून एका चार्जरची जाहिरात केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जाहिरातीमध्ये करिश्मानेही जुन्या जाहिरातीप्रमाणे पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. तसंच पूर्वीप्रमाणे तिने त्याच शैलीत डायलॉग्सही म्हटले आहेत. मात्र, या डायलॉग्समध्ये बरंच वेगळेपण आहे. पूर्वीची जाहिरात निरमा पावडरची होती. परंतु, ही जाहिरात चार्जरची आहे. 

काय आहे या जाहिरातीत?

करिश्मा पूर्वीच्या जाहिरातीप्रमाणे गाडीतून उतरते आणि दुकानात जाते. तिला पाहिल्यावर लगेच दुकानदार तिची सामानाने भरलेली पिशवी तिच्यासमोर ठेवतो. मात्र, हे पाहून ती एक चार्जर मागते. त्यावर तुम्ही कायम साधारण चार्जर वापरत होतात ना? असा प्रश्न विचारतो. त्याच्या या प्रश्नावर, घेत होते. पण, आता क्रेडिट बाउंटीमध्ये आयफोन मिळत असेल तर साधारण चार्जर तरी का घ्यायचा, असं करिश्मा म्हणते.

दरम्यान, क्रेडची ही जाहिरात १९८९ च्या निरमाच्या जाहिरातीचा थ्रोबॅक आहे. या नव्या जाहिरातीत फ्रेम आणि लाइन्स सारं काही निरमाच्या जाहिरातीप्रमाणे केलं आहे. तसंच क्रेड कायम त्यांच्या नवनवीन जाहिरातींच्या संकल्पनेसाठी ओळखलं जातं. 

टॅग्स :करिश्मा कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडटेलिव्हिजन