Join us
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यांसमोर सेटवरच मृणाल ठाकूरने लगावली शाहिदच्या कानशिलात; अभिनेत्याचा कान झाला होता सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 18:30 IST

Shahid kapoor: शाहिद आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला जर्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त शाहिदने सेटवर त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचं कथन केलं आहे.

बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर (mrunal thakur). लवकरच मृणाल आणि अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor) यांची मुख्य भूमिका असलेला 'जर्सी' (jersey) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून एका वडील आणि मुलाची कथा उलगडली जाणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिदने अर्जुन ही भूमिका साकारली आहे. तर, मृणालने त्याच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या ही जोडी अनेक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असून एका कार्यक्रमात शाहिदने मृणालने त्याच्या कानशिलात लगावल्याचं सांगितलं आहे.

अलिकडेच मृणाल आणि शाहिद या जोडीने 'द कपिल शर्मा शो' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहिदने या चित्रपटाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यामध्येच त्याने मृणालने सगळ्यांसमोर त्याच्या कानशिलात लगावल्याचं सांगितलं. 

मृणालने सगळ्यांसमोर लगावली शाहिदच्या कानशिलात

सध्या सोशल मीडियावर कपिल शर्मा शोची( kapil sharma show) चर्चा होत आहे. यात कपिलने 'जर्सी' चित्रपटाच्या ट्रेलरविषयी या दोघांना काही प्रश्न विचारले. या "कबीर सिंहनंतर तुला 'जर्सी'मध्ये मृणालच्या हातून कानशिलात बसली आहे. याविषयी काय सांगशील?" यावर शाहिदने एक मजेशीर उत्तर दिलं.  "सुरुवातीला हा सीन शूट करतांना तिने प्रेमाने मारलं होतं. त्यामुळे तिने २-३ थोबाडात आरामात मारल्या. त्यानंतर पुन्हा चौथ्यांना रिटेक घ्यावा लागला. यावेळी तिने मला इतक्या जोरात मारलं की काही काळासाठी माझा कान सुन्न झाला होता. विचार करा, चंदीगढमध्ये कडाक्याच्या थंडीत हा सीन शूट झाला होता. आणि, त्या दिवसात मला ही कानशिलात किती जोरात लागली असेल", असं शाहिद म्हणाला.

मृणालनेही दिली प्रतिक्रिया

शाहिदला जोरात कानशिलात लगावल्यामुळे मृणालने त्याची माफीदेखील मागितली.  "मला मुळात शाहिदला मारतांना फार टेन्शन आलं होतं. जर तुमच्या समोर शाहिद आहे आणि त्याला मारायचंय असं तुम्हाला सांगितलं. तर तुम्हीच सांगा तुम्हाला कसं वाटेल. त्यातच मी एक किस्सा ऐकला होता. एका मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीने अभिनेत्याला प्रचंड जोरात कानफटात मारली होती. त्यामुळे त्या अभिनेत्यानेही त्या अॅक्ट्रेसला मारलं. आता हे असं कानावर आल्यानंतर मला शाहिदला मारतांना सहाजिकच टेन्शन येणार होतं." 

दरम्यान, या शोमध्ये शाहिदने चित्रपट आणि त्याच्या पर्सनल लाइफविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. चित्रपटातील किसिंग सीनवर त्याची पत्नी मीरा राजपूतची काय रिअॅक्शन होती हेदेखील त्याने यावेळी सांगितलं. ‘कबीर सिंग’नंतर शाहिद दुसऱ्यांदा 'जर्सी'च्या निमित्ताने तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. जर्सीच्या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी हेच हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. तेलुगू चित्रपटात नानी आणि श्रद्धा श्रीनाथ ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तर हिंदीच शाहिदसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरमृणाल ठाकूरसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाकपिल शर्मा