Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भांडणाची सुरूवात मी करत नाही, पण संपवते मीच', कंगना रणौतचा शिवसेनेला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 10:55 IST

BMC ने कंगनाच्या ४८ कोटी रूपये खर्चून तयार केलेल्या ऑफिसवर बुलडोजर चालवला. ज्यामुळे कंगना चांगलीच 'जखमी' झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने जेव्हा ट्विट जॉइन केलं तेव्हापासून ती या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. कंगनाने सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग साइट जॉइन केली होत. पण काही दिवसातच सुशांत केसवरून शिवसेनेसोबत झालेल्या वादामुळे कंगनाला खाजगी नुकसानाचा सामना करावा लागला.

BMC ने कंगनाच्या ४८ कोटी रूपये खर्चून तयार केलेल्या ऑफिसवर बुलडोजर चालवला. ज्यामुळे कंगना चांगलीच 'जखमी' झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कंगना सतत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सतत महाराष्ट्र सरकार विरोधात आग ओकत आहेत. नुकतंच तिने एक ट्विट केलं. तिने त्यात नाव घेतलं नाही, पण तिने हे ट्विट शिवसेनेला संबोधून केलं असं दिसतंय.

मी भांडण सुरू करत नाही, पण संपवते....

कंगना रणौतने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मी भांडण करणारी मुलगी वाटू शकते, पण हे सत्य नाहीये. माझा हा रेकॉर्ड आहे की, मी कधीही भांडणाची सुरूवात केलेली नाही. जर कुणी या गोष्टीला चुकीचं सिद्ध करेल तर मी ट्विट सोडेन. मी कधीच स्वत: भांडण सुरू करत नाही. पण संपवते मीच. भगवान श्रीकृष्णांनी म्हटलंय की  जेव्हा तुम्हाला कुणी भांडणासाठी तयार असेल तर तुम्ही कधीही त्यांना नाही म्हणू नये'.

बीएमसीवर वार...

गुरूवारी कंगनाने तिच्या मोडक्या ऑफिसचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले होते. यात ती म्हणाली होती की, हा तिच्या स्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार आहे. 

दुसऱ्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, 'एक काळ निघून जातो घर बनवण्यात आणि तुम्ही घरे जाळताना तुम्ही आह सुद्धा करत नाही. हे बघा काय करून ठेवलंय माझ्या घराला. काय हा बलात्कार नाही?'.

मीडिया रिपोर्ट्नुसार, बीएमससीच्या कारवाईत कंगनाला २ कोटी रूपयांचं नुकसान झालं. कंगनाच्या या तीन मजली ऑफिसला उभारण्यासाठी साधारण ४८ कोटी रूपये लागले होते. 

अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...

BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार'

स्वरा भास्करने घेतली कंगना रणौतची शाळा, म्हणाली - मला शिव्या दे, हवं तर कुस्ती करू, पण...

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटलं 'सॉफ्ट पॉर्न स्टार', म्हणाली - अ‍ॅक्टिंगसाठी नाही ओळखली जात

सोनू सूदने नाव न घेता साधला कंगना रणौतवर निशाणा? ट्विट व्हायरल....

उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड