Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 12:04 IST

सध्या कंगना 'थलायवी' च्या शूटमध्ये आणि 'धाकड'च्या तयारीत बिझी आहे. यादरम्यान ती फॅन्ससाठी तिच्या अ‍ॅक्टिविटीचे अपडेट्सही देत असते.

कंगना रणौत सध्या वादग्रस्त विधानांसोबतच तिच्या आगामी सिनेमांमुळेही चर्चेत आहे. ती आपल्या सिनेमांच्या शूटींगसाठी घरापासून दूर आहे. सध्या ती 'थलायवी' च्या शूटमध्ये आणि 'धाकड'च्या तयारीत बिझी आहे. यादरम्यान ती फॅन्ससाठी तिच्या अ‍ॅक्टिविटीचे अपडेट्सही देत असते. तिने नुकताच संजय दत्तसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

कंगना रणौतने पोस्ट लिहिले की, 'जेव्हा मला समजलं की, आम्ही हैद्राबादच्या एकाच हॉटेलमध्ये थांबलो आहोत. तर मी संजू सरांना भेटून त्यांच्या तब्येतीबाबत विचारणा केली. त्यांना आधीपेक्षा हेल्दी आणि हॅंडसम बघून आनंद झाला. आम्ही तुमच्या चांगल्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करतो'. (कंगना रनौतने 'जल्लीकट्टू' ऑस्करला गेल्यावर पुन्हा मुव्ही माफियांवर साधला निशाणा, म्हणाली -...)

कंगनाच्या या पोस्टवरून तिचे फॉलोअर्स आपसात भिडले आहेत. अनेकांनी कंगनाला ट्रोल केलं तर काहींनी तिला सपोर्ट केला. लोकांनी लिहिले की, चरसचा विरोध करता-करता चरसीजवळ बसली? तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, तो नेपोटिज्मचं प्रॉडक्ट आहे. तू तुझ्याच शब्दांविरोधात आहेस. संजूबाबने तुझ्यापेक्षा जास्त सिनेमे केले आहेत. पण तुझ्यासाठी नेपो किडच राहणार.

 

दरम्यान कंगना रणौतने पुन्हा एकदा मुव्ही माफियांवर टीका केली. बॉलिवूड स्टार्सना नेहमीच निशाण्यावर घेणाऱ्या कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूड माफियांना घेरलं आहे ते ऑस्कर नामांकनाच्या निमित्ताने. बुधावारी तिने 'जल्लीकट्टू'  हा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये गेल्याने सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मुव्ही माफियावर निशाणा साधला. 

कंगना रणौतने ट्विट केलं की, बॉलिवूड विरोधात जेवढा आवाज उठवला जात होता, जेवढी चौकशी केली जात होती अखेर त्यातून काहीतरी फायदा झाला. भारतीय सिनेमे केवळ फिल्मी परिवारांसाठी नाहीयेत. मुव्ही माफिया आता आपल्या घरातच लपले आहेत आणि ज्युरीजना आपलं काम करू देत आहेत. टीम 'जल्लीकट्टू' ला शुभेच्छा'. 

टॅग्स :कंगना राणौतसंजय दत्तबॉलिवूडसोशल मीडिया