Join us

Indian 2 on OTT: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येईल कमल हासन यांचा 'इंडियन २'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 14:52 IST

दिग्गज अभिनेते कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेला 'इंडियन २' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

सुपरस्टार कमल हासन यांचा 'इंडियन २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. 'इंडियन २' (indian 2) सिनेमाने सर्वांचं प्रेम मिळवलं. हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. पण अनेकांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 'इंडियन २' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'इंडियन २'  हा १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कमल हासन (Kamal Haasan ) यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'इंडियन'चा सिक्वेल आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

'इंडियन २' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. ‘इंडियन २’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (netflix ) ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये प्रेक्षकांसाठी सिनेमा उपलब्ध होणार आहे. पण, सिनेमा हिंदी भाषेत कधी उपलब्ध होणार, याबद्दल नेटफ्लिक्सने काहीही स्पष्ट केलेले नाही. एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला सिनेमागृहानंतर ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्या भव्यदिव्य सिनेमांसाठी ओळखले जाणाऱ्या शंकर यांनी 'इंडियन २'चं दिग्दर्शन केलंय. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते.  कमल हासन यांच्याव्यतिरिक्त बॉलिवूड आणि साऊथमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय काजल अग्रवाल सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.  चेन्नई, भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये येथे चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. जोहान्सबर्ग आणि तैवानमध्येही काही भाग शूट करण्यात आले आहेत. 

कमल हासन हे उत्कृष्ट अभिनेते तर आहेतच, शिवाय ते उत्तम दिग्दर्शक, लेखक, गायकही आहेत. आजतागायत त्यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. अलिकडेच ते प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन स्टारर 'कल्कि 2898 एडी' सिनेमातही झळकले होते. फिल्मी करिअरसोबतच कमल हसन याचं राजकीय करिअर देखील नेहमीच चर्चेत असंत. 

टॅग्स :कमल हासनसेलिब्रिटीTollywoodसिनेमानेटफ्लिक्स