Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट, ओटीटीनंतर काजोलची टेलिव्हिजनवरही एन्ट्री, 'या' लोकप्रिय मालिकेत साकारणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 09:02 IST

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिकेत काजोल भूमिका साकारणार असून त्याचा प्रोमोही आला आहे.

अभिनेत्री काजोल (Kajol) म्हणजे बॉलिवूडमधील अतिशय गुणी अभिनेत्री आहे. ९० च्या दशकात तिने बॉलिवूड गाजवून सोडलं. तर आता नुकतेच तिने ओटीटीवरही पदार्पण केलं आहे. 'लस्ट स्टोरीज 2' आणि 'द ट्रायल' मुळे काजोल चर्चत आहे. इतकंच नाही तर आता ती चक्क टेलिव्हिजन मालिकेतही दिसणार आहे. स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिकेत काजोल एक छोटीशी भूमिका साकारणार असून त्याचा प्रोमोही आला आहे.

स्टार प्लसवर 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Ye Rishta Kya Kehlata Hain) ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत काजोलला एक छोटी भूमिका ऑफर झाली आहे. मालिकेत येण्याची काजोलची ही पहिलीच वेळ आहे. सध्या नेटफ्लिक्सवरील 'द ट्रायल' ही तिची वेबसिरीज गाजतेय. यामध्ये तिने 'नयोनिका' हे वकिलाचं पात्र साकारलं आहे.  याच सिरीजच्या प्रमोशनसाठी काजोल 'नयोनिका' बनून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये छोटी भूमिका करायला येत आहे.  टेली रिपोर्टरने प्रोमो शेअर केला आहे.

सध्या मालिकेत हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड मुख्य भूमिकेत आहेत. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अतिशय आवडली आहे. 'अभिमन्यू' आणि ' अक्षरा' अशी त्यांची व्यक्तिरेखा आहे. त्यांना प्रेक्षकांनी 'अभिरा' असं नाव दिलंय. अभिमन्यू आणि अक्षरा मुलाच्या कस्टडीसाठी कोर्टात गेले आहेत. अभिमन्यू आधीच केस जिंकला आहे पण अक्षराने उच्च न्यायालयात अपील केलं आहे. तिथेच तिची भेट काजोलशी म्हणजेच नयोनिकाशी होणार आहे. काजोलला मालिकेत पाहण्यासाठी मालिकेचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :काजोलटेलिव्हिजनये रिश्ता क्या कहलाता हैबॉलिवूडवेबसीरिज