Join us

"ढाई किलो के हाथ की ताकद अब साऊथ देखेगा"; सनी देओलच्या 'जाट'चा टीझर; रणदीप हुडाच्या खलनायकाने लुटली लाइमलाइट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:17 IST

सनी देओलच्या आगामी 'जाट' सिनेमाची सर्वांना उत्सुकता असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे (jatt, sunny deol)

सनी देओलच्या (sunny deol) 'जाट' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून 'जाट' सिनेमाचं पोस्टर, गाणी आणि टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेली. अशातच आज बहुचर्चित 'जाट' (jatt movie) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर एकदम अॅक्शनपॅक असून सनी देओल पुन्हा एकदा अॅक्शनपॅक अवतारात दिसत असून ट्रेलरमध्ये रणदीप हुडाने (randeep hooda) साकारलेला खलनायक चांगलाच भाव खाऊन गेलाय.  'जाट' सिनेमाचा ट्रेलर

 'जाट' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, सुरुवातीला एक शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करताना दिसतो. इतक्यात शेतामध्ये एक मृत व्यक्तीचा हात दिसतो. पुढे तोच ट्रॅक्टर अनेक मृतदेह घेऊन जातो. त्यानंतर त्या गावात रणतुंगाची दहशत दिसते. रणतुंगा हा खतरनाक खलनायक गावकऱ्यांना छळत असतो. याच रणतुंगाचा सामना करायला सनी देओल येतात. 'गदर'मध्ये हँडपंप उखडून गुन्हेगारांना यमसदनी धाडणारे सनी देओल 'जाट' सिनेमात भलामोठा पंखा घेऊन गुंडांना लोळवताना दिसत आहेत.अशाप्रकारे 'जाट' सिनेमाचा ट्रेलर जबरदस्त आहे.  या ट्रेलरमध्ये सनी देओलची अॅक्शन चर्चेत आहेच पण रणदीप हुडाने रणतुंगा या खलनायकाच्या रुपात खऱ्या अर्थाने मैफिल लुटली आहे. रणदीप हुडाचा खलनायक म्हणून जबरदस्त अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. 'जाट' सिनेमात 'छावा' मध्ये 'कवी कलश' यांची भूमिका गाजवणारा विनीत कुमार सिंगही खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय. १० एप्रिल २०२५ ला 'जाट' सिनेमा सगळीकडे रिलीज होणार आहे. अभिनेत्री सैय्यामी खेर सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :सनी देओलविनीत कुमार सिंहरणदीप हुडासंयमी खेरबॉलिवूड