Salaam Bombay Actor: मनोरंजन क्षेत्रात कलाकार होण्यासाठीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो तरुण-तरुणी मुंबईची वाट धरतात. प्रत्येकजण आपल्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी याची वाट पाहत असतो. परंतु, त्यातील फार कमी जणांनाच यशाची चव चाखायला मिळते. असाच एक अभिनेता जो आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाला. पण, आता त्याच्यावर उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे.
'सलाम बॉम्बे' या १८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळला. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली. मीरा नायरच्या या सिनेमाने प्रत्येक संवेदनशील मनाला पाझर फोडला. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांचं रोजचं जगणं, त्यांची दैना या चित्रपटात दाखवण्यात आली होती. त्या मुलाचे नाव चापू असं होतं. या चिमुकल्या बालकलाकाराचा अभिनय सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला होता. शफीक सय्यद ही भूमिका साकारली होती. त्याने त्याच्या अभिनय कौशल्याने लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटात रघुबीर यादव, इरफान खान, अनिता कंवर आणि नाना पाटेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार होते. परंतु, चापू म्हणजे चाय पाव नावाची भूमिका विशेष गाजली.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण...
दरम्यान, 'सलाम बॉम्बे' मधील त्या भूमिकेसाठी शफीक सय्यदला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. तेव्हा शफीक फक्त १२ वर्षांचा होता. त्यानंतर अभिनेता जणू इंडस्ट्रीतून गायब झाला. मोठा स्टार होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शफिकचं नशीबात काही वेगळंच घडलं. आज शफीक सय्यद ऑटो रिक्षा चालवतो. आता तो त्याची पत्नी, आई, तीन मुलांसह बेंगळुरूमधील एका छोट्या गावात राहतो. याशिवाय रिक्षा चालवण्याव्यतिरिक्त कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या टीव्ही प्रॉडक्शन युनिटमध्ये सहाय्यक म्हणून काम करतो. सुरुवातीच्या काळात शफिक मित्रांसोबत मुंबईत घरून पळून आला होता. कारण त्याला मुंबई पाहायची होती. त्याने व त्याच्या मित्रांनी चर्चगेटच्या फुटपाथवर राहून दिवस काढले होते.