Join us

३७ वर्षीय अभिनेत्री ६२ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याला करतेय डेट, अनिल कपूरसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:28 IST

प्रेमाला वयाचं बंधन नसतं म्हणतात ते खरं आहे. ३७ वर्षीय लोकप्रिय अभिनेत्री ६२ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय

प्रेमाला वयाचं बंधन नसतं. सिनेइंडस्ट्रीतील अनेक जोडप्यांकडे बघून अशीच गोष्ट वारंवार जाणवते. अशातच एकमेकांच्या वयात २५ वर्षांचं अंतर असूनही एक अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्याला डेट करत आहे. या अभिनेत्याने अनिल कपूरसोबत एका सिनेमात काम केलंय. हा अभिनेता म्हणजे  हॉलिवूडचा अॅक्शन स्टार टॉम क्रूझ. अभिनेत्री अना डी आर्मस (३७) ही टॉम क्रूझला (६२) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. टॉम आणि अना यांना लंडनमध्ये डिनर डेट करताना पाहिलं गेलं. त्यामुळे हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

टॉ आणि अनाचं अफेअर

टॉम आणि अना यांची पहिली भेट या वर्षी अर्थात २०२५ मध्ये फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या आधी झाली. यानंतर मार्चमध्ये दोघांना लंडन हेलिपोर्टमध्ये हेलिकॉप्टरने ये-जा करताना पाहण्यात आलं. टॉमने स्वतः हेलिकॉप्टर उडवून अना आणि त्यांच्या टीमला हेलिपॅडवर उतरवले होते. पुढे एप्रिलमध्ये अनाच्या जन्मदिनी हे दोघं पार्कमध्ये एकत्र चालताना दिसून आले. मे महिन्यात हे दोघे फूटबॉल स्टार डेव्हिड बेकहमच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत सुद्धा एकत्र उपस्थित होते.

अशातच एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेट करतानाचा फोटो व्हायरल झाल्याने टॉम आणि अना एकमेकांना खरंच डेट करत आहेत, अशी चर्चा आहे. अर्थात दोघांनीही अजूनही त्यांच्या नात्याचा अधिकृत खुलासा केला नाहीये. टॉमच्या 'मिशन इम्पॉसिबल: घोस्ट प्रोटोकॉल' या सिनेमात बॉलिवूड स्टार अनिल कपूर झळकले होते. याशिवाय टॉमचा या सीरिजमधील शेवटचा भाग 'मिशन इम्पॉसिबल: फायनल रेकनिंग' सिनेमा काही दिवसांपूर्वी भारतात रिलीज झाला. या सिनेमाला भारतीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता टॉम आणि अना खरंच एकमेकांना डेट करत आहेत का, याचा खुलासा लवकरच होईल.

टॅग्स :हॉलिवूडअनिल कपूरलग्नबॉलिवूड