Join us
Daily Top 2Weekly Top 5

Justin Bieber: Baby फेम हॉलिवूड गायक जस्टीन बीबर झाला बाबा, शेअर केला मुलाचा क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 10:40 IST

लेकाचं नावही आहे खूपच क्युट

लोकप्रिय हॉलिवूड गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) बाबा झाला आहे. त्याची पत्नी हेली बीबरने (Hailey Bieber) काल मुलाला जन्म दिला. लेकाचं नाव जॅक असं ठेवण्यात आलं आहे. जस्टीन आणि हेलीने क्युट फोटो शेअर करत चाहत्यांनी ही गुडन्यूज दिली. दोघांच्या आयुष्याचा नवा टप्पा सुरु झाला आहे. लग्नानंतर ६ वर्षांनी कपल आई बाबा झाले आहेत.

जस्टीन बीबर आणि हेली बीबर दोघांवरही सध्या हॉलिवूड इंडस्ट्रीतून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जस्टीन भारतातही खूप लोकप्रिय आहे. त्याचं 'बेबी' हे गाणं तर आयकॉनिक आहे. याच गाण्यामुळे त्याला पहिल्यांदा जगभरात प्रसिद्धी मिळाली. जस्टीनने जॅकच्या चिमुकल्या पायाचा फोटो शेअर करत लिहिले, 'वेलकम होम, जॅक ब्लूज बीबर.'

या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसंच कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. लोकप्रिय स्टार जस्टीन आणि हेलीने 2018 साली लग्न केलं होतं. त्याआधी जस्टीनचं हॉलिवूड गायिका सेलेना गोमेजसोबत अफेअर होतं. दोघंही सीरियस रिलेशनशिपमध्ये होते. मात्र जस्टीनने तेव्हा सेलेनाला हेली साठी धोका दिला. त्याच हेलीसोबत नंतर तो लग्नबंधनात अडकला. 

जस्टीन गेल्या महिन्यात भारतातही आला होता. अंबानींच्या वेडिंग सोहळ्यात त्याने परफॉर्म केले. त्याची 'सॉरी', 'नेव्हर से नेव्हर', 'स्टे', 'बेबी', 'लव्ह मी' यासह अनेक गाणी गाजली आहेत.

टॅग्स :जस्टिन बीबरपरिवारसोशल मीडियाहॉलिवूडसंगीत