Join us
Daily Top 2Weekly Top 5

एंजेलिना जॉली हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत? ब्रॅड पिटसोबत घटस्फोटानंतर बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 17:02 IST

ती लवकरच लॉस एंजेलिसमधून बाहेर पडणार आहे.

हॉलिवूड स्टार एंजेलिना जोली (Angelina Jolie) इंडस्ट्री सोडणार या चर्चांना उधाण आलं आहे. नुकतंच तिने लॉस एंजेलिस आणि हॉलिवूडव सोडण्यावर दिलेल्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. ती लवकरच लॉस एंजेलिसमधून बाहेर पडणार आहे. योग्य वेळ आल्यावर ती कंबोडियामध्ये शिफ्ट होणार आहे. तसंच या निर्णयामागचं मूळ कारण म्हणजे ब्रॅड पिटसोबत तिचा घटस्फोट आणि कायदेशीर लढाई हे आहे. 

एंजेलिना हॉलिवूड सोडणार?

नुकतंच एका मुलाखतीत एंजेलिना म्हणाली, 'मी आज अभिनेत्री नसते. जेव्हा माझी सुरुवात होती तेव्हा मला गोष्टी सार्वजनिक कराव्या लागतील अशी अपेक्षा नव्हती. मी हा विचार केला नव्हता. कारण मी हॉलिवूडच्या सभोवताली वाढलेली आहे म्हणून मी कधीच कोणत्या गोष्टीने प्रभावित झाले नाही. मी कधीच या गोष्टींना महत्व दिलं नाही.  मी लॉस एंजेलिस सोडणं हे माझ्या घटस्फोटानंतर जे झालं त्याचा भाग आहे.'

ती पुढे म्हणाली, 'घटस्फोटानंतर मी स्वतंत्रपणे राहण्याची आणि प्रवास करण्याची क्षमताच गमावली होती. जेव्हा कधी शक्य होईल मी इथून निघून जाईन. मी फारच उथळ जागी लहानाची मोठी झाली आहे. हॉलिवूड माझ्यासाठी स्थिर जागा नाही. माझं सोशल आयुष्यच राहिलेलं नाही. मी सध्या कोणालाच डेट करत नाहीए. माझी मुलंच माझे मित्र आहेत.'

एंजेलिना जोली हॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने वयाच्या १६ व्या वर्षी हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २० व्या वर्षापर्यंत ती ड्रग्सच्या आहारी गेली होती. मात्र तिच्या पहिल्या पतीने तिला यातून बाहेर काढलं. नंतर एंजेलिनाने हॉलिवूड गाजवलं. 

टॅग्स :अँजोलिना जॉलीहॉलिवूडब्रॅड पिटघटस्फोट