Join us

VIDEO: नादच खुळा! ढोल-नगाडा वाजवला अन्...; अभिनेता विद्युत जामवाल होळी सेलिब्रेशनमध्ये दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:56 IST

विद्युत जामवालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर होळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Vidyut Jammwal: होळी ( Holi) रंगपंचमी हे सण आनंद आणि उत्साहसोबतच परस्परांमधील नात्यांमध्ये रंग भरणारे आहेत. संपूर्ण देशभरात हा सण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. आबालवृद्ध मनसोक्त या उत्सवाचा आनंद लुटतात. परस्परांवर पाणी आणि रंगांची उधळण करतात. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी मंडळी देखील मोठ्या जल्लोषात होळी, धुलिवंदन साजरी करतात. अशातच होळीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा (Vidyut Jammwal) एक व्हिडीओ समोर आला आहे. यंदाची होळी साजरी करण्यासाठी अभिनेता थेट मथुरानगरीत पोहोचला आहे.

नुकताच विद्युत जामवालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर होळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. मथुरा येथे व्दारकाधीश मंदिरात लोकांसोबत तो होळी साजरी करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये डोक्यावर फेटा तसेच पारंपरिक वेशभू्षेत अभिनेता ढोल-नगाडा वाजवताना दिसतो आहे. अभिनेत्याचा हा व्हिडीओ  सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विद्यूत जामवालने या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलंय, "याचा अनुभव घ्या... ब्रज की होली...!" विद्युतच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याशिवाय त्याचं कौतुक देखील केलं आहे. 

वर्कफ्रंट

विद्युत जामवालच्या कामाबद्दल बोलायचं तर 'कमांडो', 'फोर्स' या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली. सध्या अभिनेता त्याचा आगामी साउथ चित्रपट 'मद्रासी'मुळे चर्चेत आहे. ए. आर. मुरुगगोदास यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :विद्युत जामवालबॉलिवूडसेलिब्रिटीहोळी 2025