Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या वाढदिवशी महिलेने 'धुरंधर' बघितला, वाटेत रणवीर सिंग भेटला; म्हणाली- "साडे तीन तास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 12:22 IST

लग्नाच्या वाढदिवशी एक महिला रणवीर सिंगचा धुरंधर बघायला गेली. थिएटरबाहेर आल्यावर तिला रणवीर दिसला. तिने सांगितलं....

सध्या 'धुरंधर' सिनेमाची खूप चर्चा आहे. रणवीर सिंगची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.  'धुरंधर' सिनेमा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होता. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली. 'धुरंधर'च्या संपूर्ण प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणवीरने चाहत्यांसोबतही चांगला संवाद साधला. अशातच  'धुरंधर' पाहून थिएटरबाहेर त्याला एक चाहती अभिनेत्याला भेटायला आली. त्या चाहतीने 'धुरंधर' कसा वाटला, हे रणवीरला सांगितलंमहिलेचा रणवीरसोबत संवाद, म्हणाली...

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला  'धुरंधर' बघून आल्यावर थिएटरबाहेर येते. तोच तिला रणवीर सिंग दिसतो. महिला रणवीरला सांगते की, ''आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणि धुरंधर पाहिल्याने आजचा दिवस खूप छान गेला आहे. साडे तीन तास म्हणजे पैसा वसूल. तू खूप छान अभिनय केला आहेस. खूप प्रेम.''

अशाप्रकारे महिलेने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. महिलेच्या लग्नाचा वाढदिवस आहे हे कळताच रणवीरने तिच्या पतीची भेट घेतली आणि दोघांनाही मिठी मारली. शेवटी दोघांसोबत हात मिळवून त्याने सेल्फी घेतला. अशाप्रकारे रणवीर आणि त्याच्या चाहतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.'धुरंधर'ची कमाई किती?

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' या चित्रपटाने ओपनिंग डेला अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी केली होती. Sacnilk च्या माहितीनुसार, 'धुरंधर'ने पहिल्या दिवशी २७ कोटी रुपयांचे शानदार कलेक्शन केले होते. मात्र, वीकेंडचा फायदा घेत, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ दिसून आली.  'धुरंधर'ने दुसऱ्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

या दमदार कलेक्शनमुळे, पहिल्या दोन दिवसांत 'धुरंधर'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण ५८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या दिवशी ३१ कोटींची कमाई करून 'धुरंधर'ने ओपनिंग डेचा (२७ कोटी) विक्रम मोडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman watches 'Dhurandhar' on anniversary, meets Ranveer Singh, praises movie.

Web Summary : A woman celebrating her anniversary watched 'Dhurandhar' and met Ranveer Singh. She loved the film, calling it 'worth the money' and praised Ranveer's acting. 'Dhurandhar' earned ₹58 crore in two days, surpassing opening day collections.
टॅग्स :रणवीर सिंगआर.माधवनसंजय दत्तअर्जुन रामपालबॉलिवूडटिव्ही कलाकारटेलिव्हिजन