Join us

"मी चपाती खात नाही आणि नाश्त्याला..."; सोनू सूदने सांगितलं त्याच्या फिटनेसचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:11 IST

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने एका मुलाखतीत फिटनेस टीप्स आणि डाएट प्लॅन सांगितला आहे (sonu sood)

अभिनेता सोनू सूद हा फिटनेस फ्रीक आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. सोनू सूदला आपण 'दबंग', 'जोधा अकबर', 'सिंबा' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सोनू सूद गेली अनेक वर्ष बॉलिवूड आणि साउथ सिनेमांतही काम करतोय. सोनू सूद स्वतःच्या तब्येतीला जपताना दिसतो. सोनूने नुकत्याच एका मुलाखतीत त्याचं डाएट रुटिन काय आहे, याबद्दल खुलासा केला. सोनू सूदचं फिटनेस रुटिन फॉलो केलं तर नक्कीचा आपल्यालाही फायदा होऊ शकतो.

सोनू सूदने सांगितल्या फिटनेस टिप्स

सोनू सूदने एका मुलाखतीत सांगितलं की, "मी शाकाहारी आहे. माझं डाएट अत्यंत कंटाळवाणं आहे. कोणी माझ्या घरी आल्यावर माझं खाणं बघून मी हॉस्पिटलमधील जेवण जेवतोय असं म्हणतात. तुम्ही तुम्हाला हवं ते खाऊ शकता. मी सोडून सर्वजण नॉन-वेज पदार्थ खातात. सर्वांसाठी चांगलं जेवण बनवलं जातं. आमच्याकडे बेस्ट आचारी आहेत.  शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून  किंवा आजही जेवणाच्या बाबतीत माझे कसलेही नखरे नाहीत."

सोनू सूद पुढे म्हणाला की, "काही महिन्यांपूर्वी मी चपाती खाणं बंद केलं. दुपारी मी छोट्या वाटीत डाळ घेतो आणि त्यासोबत भात खातो. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी मी व्हाईट एग ऑमलेट, सॅलड, अव्होकाडो आणि पपई असा आहार घेतो. मी फक्त हेल्दी खातो. मी माझ्या डाएटच्या बाबतीत कधीही चीट करत नाही. मी कधीकधी मक्के की रोटीचा आस्वाद घेतो. डाएटमध्ये सातत्य राखणं मला गरजेचं वाटतं. अनेकदा सेटवर असताना सलमान खानसारखे सुपरस्टार मला ड्रिंक करण्याचा आग्रह करतात. परंतु नंतर मला ड्रिंक पाजण्याचे सर्वांचे प्रयत्न फोल ठरतात." सोनू सूदचा आगामी 'फतेह' सिनेमा १० जानेवारीला रिलीज होतोय.

टॅग्स :सोनू सूदफिटनेस टिप्सबॉलिवूड