Join us

"माझ्या मुलासोबत मी जास्त कडक वागते"; फराह खान म्हणाली, "त्यांनी आजपर्यंत क्लब, पार्ट्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:27 IST

लेकाचा आणि मुलींचा वेगवेगळा सांभाळ करते, फराह खान पालकत्वाबद्दल काय म्हणाली?

कोरिओग्राफर, दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan)  हे बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. 'मै हू ना', 'हॅपी न्यू इयर' यांसारख्या सिनेमांचं तिने दिग्दर्शन केलं आहे. तर हिंदी सिनेमातील अनेक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. फराह खान सध्या तिच्या युट्यूब चॅनलवरुन सर्वांना भेटत असते. नुकतंच तिने अभिनेत्री रुबिना दिलैकसोबत (Rubina Dilaik)  बातचीत करताना मुलांच्या पालनपोषणावर भाष्य केलं. 

अभिनेत्री रुबिना दिलैकही काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. नुकतीच ती फराह खानच्या घरी गेली होती. तेव्हा दोघींमध्ये पालकत्वावर चर्चा झाली. फराह खानला दोन मुली आणि एक मुलगा आहे. आपल्या मुलांच्या पालनपोषणाबाबतीत फराह म्हणाली, "माझी मुलं १७ वर्षांची आहेत. पण आजही त्यांचं लक्ष फक्त अभ्यासातच आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस झाला आणि त्यांनी कुटुंबासोबतच डिनर करत तो साजरा केला. त्यांनी आजपर्यंत क्लबला जाऊन पार्टी करण्याचा हट्ट केला नाही. माझ्या मुलींनी अजून मेकअपलाही हात लावलेला नाही. आयब्रोजही केलेले नाहीत. त्यांचं पूर्ण लक्ष अभ्यासातच आहे."

ती पुढे म्हणाली, "मी थोडी कडक आई आहे. माझी मुलं हवं तिथे जाऊ शकतात पण मी सतत त्यांना ट्रॅक करत असते. आम्ही रोज बसून गॉसिप करतो जेणेकरुन त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे मला समजावं."

मुलाला वेगळी शिकवण देते

रुबिनाने फराहला विचारलं की ती आपल्या मुलाला मुलींपेक्षा वेगळी शिकवण देते का? यावर ती म्हणाली, "हो मी त्याचा जरा वेगळ्या पद्धतीने सांभाळ करते. मी त्याच्यासोबत जास्त कडक वागते. मुलींसोबत कसं वागायचं हे मी त्याला शिकवत राहते. मित्रांनी आपल्या बहि‍णींबद्दल चुकीचं बोललं तर ते वाईट आहे हे मी त्याला शिकवलं. मित्र जर मुलींबद्दल काहीतरी वाईट बोलत असतील तर तू त्यात सहभागी होऊ नको असंही मी त्याला सांगते."

टॅग्स :फराह खानबॉलिवूडपालकत्वपरिवार