Join us

सलमानच्या 'रेस-3' सोबत सनी देओलचं खास कनेक्शन, ट्विट करुन केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 14:32 IST

बॉबीच्या या सिनेमाबाबत त्याच्या परिवारातील सदस्यही खूश आहेत. सनी देओलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन बॉबीला शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच या सिनेमासोबतचं खास कनेक्शनही सांगितलं. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा 'रेस 3' हा सिनेमा रिलीज झाला आहे. बॉबी देओल या सिनेमाच्या माध्यामातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री घेतोय. या सिनेमासाठी त्याने आपल्या बॉडी आणि लूकमध्ये बदल केले आहेत. बॉबीच्या या सिनेमाबाबत त्याच्या परिवारातील सदस्यही खूश आहेत. सनी देओलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन बॉबीला शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच या सिनेमासोबतचं खास कनेक्शनही सांगितलं. 

सनी देओलने ट्विट करत लिहिले की, 'माझ्या लहान भावा ऑल द बेस्ट. 17 वर्षांपूर्वी याच दिवशी 'गदर' सिनेमा रिलीज झाला होता. रेस 3 ला सुद्धा तसंच ऐतिहासिक यश मिळो'.

सनी देओल यांचा 'गदर एक प्रेम कथा' सिनेमा 15 जून 2001 मध्ये रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आजही हा सिनेमा आवडणारा एक प्रेक्षकवर्ग आहे. 

टॅग्स :सलमान खानसनी देओलबॉलिवूडबॉबी देओलट्विटर