Sara Arjun Father Post: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. धुरंधर चित्रपटाला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असूनही या चित्रपटाची सध्या थिएटरमध्ये चलती पाहायला मिळतेय.एकीकडे रणवीर सिंहच्या कामाचं कौतुक होतंय, त्याचबरोबर अभिनेत्री सारा अर्जुन देखील चांगलाच भाव खाऊन गेली आहे. दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. मात्र, तुम्हाला माहितीये सारा अर्जुन लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता राम अर्जुनची मुलगी आहे. धुरंधरमुळे लेकीचं सर्वत्र होणारं कौतुक पाहून राज अर्जुनने लेकीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता राज अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये 'धुरंधर' चित्रपटातील त्यांच्या मुलीच्या भूमिकेचं कौतुक केलंय आणि सारावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसंच या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याचे संघर्षाचे दिवस आणि लेक साराच्या जन्मानंतर बदललेली परिस्थिती याबद्दलही सांगितलं आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय," एक वडील, एक कलाकार आणि दोन स्वप्नांचा प्रवास. कधीकधी आयुष्य समजून घेण्यासाठी, आपल्याला मागे वळून पाहावं लागतं.त्यानंतर मागे वळून पाहताना, आपल्याला समजतं की आपण आपल्या मुलांना वाढवत आहोत असे आपल्याला वाटते, परंतु वेळ आणि संधी दाखवते की हा अनुभव आपल्याला मोठं बनवत आहे. १९९९ - एक शहर, एक स्वप्न आणि एक न पाहिलेली लढाई. १९९९ मध्ये मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या मनात फक्त दोनच गोष्टी होत्या - भूक आणि विश्वास.कामाची भूक.फक्त स्वतःवर विश्वास. गाडी नाही, कोणाशीच ओळख नाही. एक मुलगा, एक स्वप्न आणि एक शहर जे दररोज विचारत असे, "तुला खरोखर हे सर्व हवं आहे का?"
त्यानंतर पुढे अभिनेत्याने म्हटलंय," रोज एक ऑडिशन आणि मिळणारा नकार. दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच असायचं. मग, २००५ मध्ये, माझ्या आयुष्यात एक आशेचा किरण आला, तो म्हणजे सारा...'मुली म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद असते, मी ते ऐकलं होतं, पण खरंतर मी ते जगलो. त्यानंतर लवकरच, मला माझी पहिली मुख्य भूमिका मिळाली - राम गोपाल वर्मांचा "शबरी".काही कारणामुळे चित्रपट आला नाही, पण त्यामुळे माझ्या आतला वणवा पेटत राहिला.पहिल्यांदाच मला असं वाटलं की मी काहीतरी बनू शकतो, मी काहीतरी करू शकतो. आणि खरं सांगायचं तर, जर ती माझ्या आयुष्यात आला नसती, तर मी आज जो आहे तो कदाचित नसतो.लोक म्हणतात की पालक त्यांच्या मुलांना मार्ग दाखवतात, पण माझी गोष्ट उलट आहे. मी माझ्या मुलीमुळे योग्य त्या ठिकाणी पोहोचलो. काम थांबेल, मार्ग सापडणार नाही, पण ती हे सगळं पाहत हळूहळू मोठी होईल, शांतपणे मला धरून राहील.मी कधीच खचलो नाही, मी संकटांपासून दूर पळून गेलो नाही,मी तिथेच उभा राहिलो. कारण तिचे बोलके डोळे बरंच काही सांगायचे. वडील असणं म्हणजे फक्त वडील असणं नाही. कधी तुम्हाला मित्र तर कधी भाऊ बनावं लागतं.तर कधीकधी तुम्हाला वाऱ्यासारखं बनावं लागतं जिथे भीती नसते, फक्त विश्वास असतो."
लेक साराचं कौतुक करत राम अर्जुन म्हणाला...
"मी तिला मार्ग दाखवला नाही, मी फक्त तिच्यासोबत चाललो. मी तिच्या स्वप्नांचा रक्षक बनलो नाही - मी तिचा साथीदार बनलो. मी फक्त एवढंच म्हटलं, "तू स्वप्ने पहा, मी तुझ्या मागे उभा आहे." आणि सत्य हे आहे: जेव्हा आपण आपल्या मुलांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो, तेव्हा ते देखील एके दिवशी आपले नाव मोठं करतील... कहानी अभी बाकी है...", अशा आशयाची पोस्ट शेअर करत अभिनेत्याने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
Web Summary : Raj Arjun penned a heartfelt note praising his daughter Sara Arjun's performance in 'Dhurandhar'. He shared his struggles and how Sara's arrival changed his life, inspiring him to pursue his dreams and achieve success.
Web Summary : राज अर्जुन ने अपनी बेटी सारा अर्जुन के 'धुरंधर' में प्रदर्शन की सराहना करते हुए एक हार्दिक नोट लिखा। उन्होंने अपने संघर्षों और कैसे सारा के आने से उनका जीवन बदल गया, जिससे उन्हें अपने सपनों को पूरा करने और सफलता प्राप्त करने की प्रेरणा मिली, साझा किया।