अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) काही महिन्यांपूर्वीच आई झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. दुआ असं लेकीचं नाव ठेवण्यात आलं. लेकीच्या जन्मानंतर दीपिका आता पुन्हा फीट झाली आहे. तिने नुकतेच पॅरिसमधील फोटो अपलोड केले आहेत. आयफेल टॉवरसमोर तिने एकदम स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. यावर रणवीर सिंहच्या कमेंटने लक्ष वेधलं आहे.
लुईस व्हिटॉन पॅरिसफॅशन वीकसाठी काल दीपिका पदुकोणने पॅरिसमध्ये हजेरी लावली. व्हाईट ओव्हरसाईज्ड ब्लेझर, ब्रिटीश स्टाईल हॅट, ब्लॅक लेगिंग्स आणि हील्समध्ये ती स्टायलिश दिसत आहे. यासोबत तिने लेदर ग्लोव्ह्ज घातले आहेत. स्कार्फ घेतला आहे आणि लाल रंगाची लिपस्टिक लावत लूक पूर्ण केला आहे. रुफटॉपवर तिने हे फोटोशूट केलं आहे ज्यात मागे आयफेल टॉवर स्पष्ट दिसतोय. लेकीच्या जन्मानंतर काहीच महिन्यात दीपिकाचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे. दीपिका पुन्हा त्याच टोन्ड फिगरमध्ये आली आहे.
दीपिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यातच तिचा नवरा रणवीर सिंहच्या कमेंटने लक्ष वेधलं आहे. 'देवा माझ्यावर दया कर' अशी मजेशीर कमेंट केली आहे. आई झाल्यानंतर दीपिका मोजक्याच ठिकाणी हजेरी लावते. सध्या ती पालकत्वाचा आनंद घेत आहे. अद्याप रणवीर आणि दीपिकाने लेकीची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही.