रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारं कपल आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर दोघांनीही भलामोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. त्यामुळे त्यांच्याबाबतीत जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. सध्या या कपलने एक मोठा व्यव्हार केलाय. नुकताच दीपिकाने आणि रणवीरने मुंबईमधील लग्झरी अपार्टंमेंट भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे.
घर, फ्लॅट आणि अपार्टमेंट्स भाडेतत्वावर देऊन मोठी कमाई करण्याचा बॉलिवूड सेलिब्रिटींचा ट्रेंड खूप जुना आहे. अलीकडेच अभिनेता शाहिद कपूरनेही त्याचे एक अपार्टमेंट भाडेतत्वावर दिले आहे. आता आता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचेही नाव या यादीत जोडले गेले आहे. ब्यू मोंडे टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये असलेल्या या अपार्टंमेंटचं एका महिन्याचं भाडं 7 लाख रुपये इतकं आहे. दोघांनी हे अपार्टंमेंट सुमारे 36 महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिलं आहे.
फिल्मी करिअरशिवाय दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे मुलगी दुआच्या जन्मामुळे चर्चेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी 8 सप्टेंबर रोजी दीपिकाने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षानंतर ते दोघे आई-बाबा झाले आहेत. अलीकडेच हे जोडपे त्यांच्या नवजात बाळासह विमानतळावर स्पॉट झाले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दोघेही अलिकडेच दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सुपरस्टार अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' सिनेमात झळकले आहेत.