Join us

वडिलांच्या निधनानंतर खचली ११ वर्षांची लेक वंशिका, इन्स्टाग्राम अकाऊंटही केलं डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:48 IST

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर मुलगी वंशिकाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटच डिलीट केलं आहे.

बॉलिवुड अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यूचा सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांची ११ वर्षांची मुलगी वंशिका (Vanshika Kaushik) पूर्णत: खचली आहे. वंशिका वडील सतीश कौशिक यांच्या खूप जवळ होती. बापलेकीमध्ये खूप छान नातं होतं. आपल्या २ वर्षांच्या मुलाला गमावल्यानंतर सतीश कौशिक ५६ व्या वर्षी बाप बनले होते. त्यामुळे वंशिकावर त्यांचा खूप जीव होता. वंशिका इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह होती. सतीश कौशिक लेकीबरोबर इनस्टाग्राम रील (Instagram Reels) बनवायचे आणि ते व्हायरल व्हायचे.

वंशिकाने इन्स्टाग्राम अकाऊंट केलं डिलीट

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर मुलगी वंशिकाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटच डिलीट केलं आहे. 'वंशिका केएस्थेटिक' नावाने तिचं प्रायव्हेट अकाऊंट होतं. तिने त्यावर वडिलांबरोबर फोटो, रील्स पोस्ट केले होते. आता वंशिकाने अकाऊंट डिलीट केलं आहे. वडिलांच्या निधनाचं दु:ख ती पचवू शकत नाहीए ती पूर्णपणे खचली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. सतीश कौशिक यांची पत्नी शशी आता वंशिकाची काळजी घेत आहे. 

'मिस्टर इंडिया' सिनेमात 'कॅलेंडर'ची भूमिका करणारे सतीश कौशिक आज आपल्यात नाहीत.  ९ मार्च रोजी त्यांचं निधन झालं. आदल्या दिवशीच ते मित्राच्या फार्म हाऊसवर होळी पार्टीत सहभागी झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना छातीत दुखायला लागल्याने त्वरित रुग्णालयात नेले. तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

स्टुडिओ बनवण्याची होती इच्छा

सतीश कौशिक यांची एक मोठा स्टुडिओ बनवण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. आता त्यांचा पुतण्या निशांत ही इच्छा पूर्ण करणार असल्याचं त्याने सांगितलं. निशांत यांनीच सतीश कौशिक यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला होता.

टॅग्स :सतीश कौशिकमृत्यूपरिवारइन्स्टाग्राम