Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या अंगावरचे डाग...", कीमो थेरेपीनंतर हिना खाननं शेअर केली पोस्ट, काय म्हटलंय पोस्टमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 08:39 IST

अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाली आहे.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan)  ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाली आहे. हिनाला स्टेज 3 कॅन्सरचं निदान झालं असून सध्या ती उपचार घेत आहे. हिना मात्र या परिस्थितीतही अतिशय स्थिर आणि संयमी दिसून येत आहे. नुकतेच तिनं एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिने कीमो थेरपीनंतरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या शरीरावर डाग पाहायला मिळत आहेत.

हिनानं पोस्ट शेअर करत लिहलं, "तुम्हाला या फोटोत काय दिसतंय? माझ्या अंगावरचे डाग की डोळ्यातील आशा? हे व्रण, डाग माझे आहेत, मी त्यांना प्रेमाने स्वीकारलंय.  मी पात्र असलेल्या माझ्या शरीरातल्या चांगल्या बदलाचं ते पहिलं लक्षण आहे. माझ्या डोळ्यातल्या आशा माझ्या आत्म्याचं प्रतिबिंब आहेत. या प्रवासात मला अंधारमय बोगद्याच्या शेवटीही प्रकाश दिसतोय. मला माहितीये की मी बरी होतेय, मी तुमच्यासाठीही प्रार्थना करतेय', असं हिनानं म्हटलंय.

हिना खानला सध्या सगळेच आधार देत आहेत. चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. सर्व कलाकारांनीही कमेंट करत तिला आधार दिला आहे. हिना जिद्दीने आणि अतिशय संयमाने या आजाराला सामोरं जात असून चाहते तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.

हिनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'ये रिश्ता क्या  कहलाता है' मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे. यानंतर तिनं नागिन तसंच इतर काही मालिकांमध्ये काम केलं. तर काही महिन्यांपूर्वी तिचा हॉलिवूड सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. सध्या कॅन्सरवर उपचार घेत असून तिला अभिनयातूनही ब्रेक घ्यावा लागला आहे. या कारणामुळे तिचा आगामी शो 'रापचिक रीटा' मधून हिनाला रिप्लेस करण्यात आलं आहे. 

टॅग्स :हिना खानकर्करोगसेलिब्रिटीहॉस्पिटलबॉलिवूडसोशल मीडियाइन्स्टाग्राम