बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन मलायका अरोरा (Malaika Arora) हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती दुसऱ्यांदा लग्न करणार का? याविषयी खुलासा केलाय. यावेळी तिने अरबाज खानचं नाव घेतलं नसलं तरीही पहिल्या लग्नाच्या वेळेस तिच्याकडून काय चूक झाली, याचा मनमोकळा खुलासा तिने केला आहे. काय म्हणाली मलायका?
लग्नाबद्दल काय म्हणाली मलायका?
'पिंकविला'ला दिलेल्या एका मुलाखतीत, मलायकाला १६ वर्षांपूर्वीच्या तिच्या रिलेशनशिपच्या दिवसांची आठवण करून देत, आजच्या तरुणांना काय सल्ला देशील, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मलायका म्हणाली, "तरुण मुलींनी लग्नापूर्वी थोडा वेळ घेतला पाहिजे. मला कळत नाही की मुलींना इतक्या लवकर लग्न करण्याची घाई का असते, त्याची खरोखर गरज नाही. आयुष्य थोडं समजून घ्या, आधी काहीतरी काम करा. नंतर हा निर्णय करा. माझंं खूप कमी वयात लग्न झालं होतं. त्यामुळे तुमचा वेळ घेऊन लग्न करा"त्यानंतर पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयावर काय मत आहे असं विचारताच मलायका म्हणाली, ''कधीही काही होऊ शकतं. मी खूप रोमँटिक आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. माझा प्रेमाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल दृढ विश्वास आहे. त्यामुळे कधीही काही होऊ शकतं.'', अशाप्रकारे मलायकाने पुन्हा लग्न करणार चर्चांवर नकारही दिला नाही आणि होकारही दिली नाही. मलायकाचं पूर्वी अभिनेता अरबाज खानसोबत लग्न झालं होतं आणि त्यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु काहीच महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं.
Web Summary : Malaika Arora hasn't ruled out remarriage, expressing her strong belief in love. She advised young women to marry later, learning from her early marriage experience with Arbaaz Khan. Malaika is currently single after breaking up with Arjun Kapoor.
Web Summary : मलाइका अरोड़ा ने पुनर्विवाह से इनकार नहीं किया, प्यार में विश्वास जताया। उन्होंने युवतियों को देर से शादी करने की सलाह दी, अरबाज खान के साथ अपनी शुरुआती शादी से सीखा। अर्जुन कपूर से ब्रेकअप के बाद मलाइका सिंगल हैं।