Join us

कोण आहे हुमा कुरेशीचा होणारा नवरा? विकी कौशल, आलिया भट, वरुण धवनसोबत आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:53 IST

हुमा कुरेशीच्या साखरपुड्याची चर्चा आज रंगली. हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा कोण आहे, हे जाणून तुम्ही थक्क व्हाल

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिने नुकताच तिचा बॉयफ्रेंड रचित सिंगसोबत (Rachit Singh) गुपचूप साखरपुडा उरकल्याची जोरदार चर्चा आहे. हुमाचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. हुमाचा बॉयफ्रेंड कोण आहे, याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. हुमाच्या बॉयफ्रेंडचं बॉलिवूडशी तगडं कनेक्शन आहे. जाणून घ्या

कोण आहे हुमाचा बॉयफ्रेंड रचित सिंग?

हुमाचा बॉयफ्रेंड रचित सिंग हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक (Acting Coach) असून तो स्वतःही एक अभिनेता आहे. त्याने आलिया भट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल आणि अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांना अभिनयाचं प्रशिक्षण दिले आहे. हुमाच्या बॉयफ्रेंडने 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अनेक वर्षांपासून तो मुंबईमध्ये कार्यरत आहे. एका रिपोर्टनुसार, त्याने २०१६ मध्ये अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी मुंबई गाठले आणि अतुल मोंगिया यांच्यासोबत काम सुरू केलं.

साखरपुड्याची चर्चा

हुमा आणि रचित यांच्या नात्याची चर्चा सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नापासून सुरू झाली होती, जेव्हा ते दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता अकासा सिंगने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हुमा आणि रचितसोबतचा एक फोटो शेअर केला, ज्यावर तिने "रचित व हुमा, तुमच्या स्वर्गासारख्या जगाला एक नाव दिल्याबद्दल अभिनंदन" असे कॅप्शन लिहिले. या पोस्टमुळे त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली. तसेच, अलीकडेच हुमा रचितच्या वाढदिवसाच्या पार्टीतही दिसली होती. साखरपुड्याच्या या चर्चांवर अद्याप हुमा कुरेशी किंवा रचित सिंगने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, त्यांच्या लग्नाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :हुमा कुरेशीलग्नरिलेशनशिपबॉलिवूड