Join us

Video: 'एवढा माज कसला?'; 'गदर 2' प्रदर्शित होताच सनीचा बदलला अॅटिट्यूड, पोलिसांकडे केलं दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 13:21 IST

Sunny deol: सनीला भेटायला आलेल्या पोलिसांना अभिनेत्याने दुर्लक्षित केलं.

सनी देओल  (sunny deol) याचा 'गदर 2' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे अनेक शो हाऊसफूल होत आहेत. यामध्येच सनी देओलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर हा कसला माज आहे, असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनी, तारासिंगच्या गेटअपमध्ये असून त्याला पाहून अनेक चाहते त्याच्यासोबत फोटो काढायला पुढे सरसावतात. इतकंच नाही तर एक पोलीसदेखील सनीसोबत हात मिळवायला येतो. परंतु, सनी त्याला हात न मिळवताच पुढे जातो. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

‘मी सिनेमा पाहण्यासाठी जाणार नाही.. यांचा ऍटिट्यूड मला माहिती आहे,’ असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर,एवढा माज आहे तरी कसाल?, ‘सध्या साथीचे आजार सुरु आहेत म्हणून त्यांनी सावधानी बाळगली आहे…’ अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, सनी देओलच्या गदर 2 ने पहिल्याच दिवशी ४० कोटींचा गल्ला जमवला.  तर दुसऱ्या दिवशी ४३ कोटींची कमाई झाली. त्यामुळे ही आकडेवारी पाहता हा सिनेमा १०० कोटींची कमाई नक्कीच करेल असं म्हटलं जात आहे.

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअमिषा पटेल