Join us
Daily Top 2Weekly Top 5

"१२ वर्षांपूर्वी याच दिवशी..." स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 11:06 IST

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. त्याच्या स्ट्रगलच्या काळातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (vicky kaushal)

विकी कौशल (Vicky Kaushal) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अनुराग कश्यपसोबत 'गँग्ज ऑफ वासेपूर'मध्ये विकीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून जबाबदारी निभावली. पुढे 'मसान' सिनेमातून विकीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. विकी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता झालाय. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर विकीने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. अशातच विकीच्या स्ट्रगलचा काळातला फोटो व्हायरल झालाय. या फोटोत विकीला पाहून चाहते आश्चर्यचकीत होत आहेत.

विकी कौशलने शेअर स्ट्रगल काळातील फोटो

विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत त्याच्या हातात ऑडिशन स्लेट बोर्डचा फोटो दिसतो. ऑडिशन देताना हे फोटो काढण्यात आले आहेत. स्लेटवर विकीचे नाव, वय आणि जन्मतारीख यासह अनेक माहिती लिहिली आहे. तर दुसऱ्या फोटोत तो कारच्या छतावर उभा राहून चाहत्यांची भेट घेताना करताना दिसत आहे. विकीने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, "१२ वर्षांपूर्वी या दिवशी. रातोरात काहीही घडत नाही. तुमच्या सर्व प्रेम आणि आशीर्वादांसाठी नेहमीच आभारी आहे."

विकीच्या फोटोंवर चाहते फिदा

विकीच्या या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय. हिंदी नव्हे तर मराठी कलाकारांनीही विकीच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे. विकीचे बाबा शाम कौशल या फोटोखाली लिहितात, 'प्राऊड ऑफ यू पुत्तर. देव आहे आणि खूप दयाळू आहे. नेहमी प्रेम आणि आशीर्वाद. जोर दी झाप्पी. राब राखा', अभिनेत्री मृणाल ठाकूर या फोटोखाली लिहिते, 'माझे हृदय तुझ्यासाठी खूप आनंदी आहे विकी', मराठमोळी अभिनेत्री नम्रता संभेराव लिहिते, 'कायम तू फेव्हरेट आहेस'. विकीचा तृप्ती डिमरीसोबत आगामी 'बॅड न्यूज' सिनेमा १९ जुलैला रिलीज होणार आहे.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफमृणाल ठाकूरनम्रता आवटे संभेराव