Join us

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला एकटाच आला विकी कौशल, प्रेग्नंसीमुळे कतरिनाची गैरहजेरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:14 IST

कतरिना कैफ ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म

Vicky Kaushal at premiere: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान दिग्दर्शित 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिज प्रदर्शित झाली आहे. कालच या सीरिजचा प्रीमियर झाला. या प्रीमियरला अख्खं बॉलिवूड अवतरलं. खान फॅमिली, अजय देवगण, काजोल, अंबानी फॅमिली, बॉबी देओल, अनन्या पांडे, तमन्ना भाटिया, राघव जुयाल, खुशी कपूर, माधुरी दीक्षित असे अनेक कलाकार दिसले. तसंच यावेळी विकी कौशलही दिसला. मात्र त्याच्यासोबत कतरिना आली नाही. यावरुन कतरिना खरोखरंच प्रेग्नंट आहे ही चर्चा सुरु झाली आहे.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिजच्या प्रीमियरला विकी कौशलनेही हजेरी लावली. 'छावा'च्या यशानंतर विकीचा भाव वधारला आहे. तसंच बॉलिवूडमध्ये आता त्याने जम बसवला आहे. ब्लॅक रंगाच्या सूट बूटमध्ये विकी हँडसम दिसत होता. मात्र यावेळी विकी एकटाच आला होता. त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसली नाही. यावरुन कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना आणखी उधाण आलं. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच ती बाळाला जन्म देणार असल्याची बातमी याआधीही आलीच होती. प्रीमियरला विकी एकटाच हजर झाल्याने त्या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तबच झालं आहे.

कतरिना कैफ वयाच्या ४२ व्या वर्षी आई होणार आहे. २०२१ मध्ये विकी आणि कतरिनाने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. कतरिना विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर ४ वर्षात त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच कियारा अडवाणीने गोंडस मुलीला जन्म दिला. तसंच गेल्या वर्षी दीपिका पादुकोणनेही मुलीला जन्म दिला. गेल्या काही वर्षात इंडस्ट्रीतील अनेक आघाडीचे सेलिब्रिटी आईबाबा झाले आहेत. त्यात आता विकी-कतरिनाचाही समावेश होत आहे. 

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफबॉलिवूडप्रेग्नंसी