Join us

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding:अखेर कतरिना झाली मिसेस कौशल; राजेशाही थाटात पार पडला vickatचा लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:59 IST

Vicky Kaushal and Katrina Kaif: राजस्थानमधील माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये मोठ्या राजेशाही थाटात विकी- कतरिनाचा विवाहसोहळा संपन्न झाला.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा लग्नसोहळा अखेर पार पडला आहे. राजस्थानमधील (rajasthan) माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये मोठ्या राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. २०२१ मधील बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असा हा लग्नसोहळा ठरला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून या लग्नाविषयी अनेक अपडेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अखेर विकी-कतरिनाची जोडी विवाहबंधनात अडकली आहे.

'ई टाइम्स'च्या वृत्तानुसार,  काही वेळापूर्वीच विकी आणि कतरिनाने हिंदू पद्धतीने सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला विकी-कतरिनाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.

लग्नात विकी-कतरिनाने दिली 'या' कपड्यांना पसंती

राजेशाही थाटात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये कतरिनाने डार्क गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर विकीने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात विकीने रॉयल एन्ट्री घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, विकीने एका विंटेज कारमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. त्याच्या एन्ट्रीला मोठ्याने ढोलताशांचा गजर करण्यात आला होता.

दरम्यान, या लग्नसोहळ्याची गेल्या आठवड्याभरापासून चर्चा होती. अखेर हा विवाह सोहळा संपन्न झाला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे या लग्नात विकी-कतरिनाने पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचं सांगण्यात येतं. या जोडीने जेवणाच्या मेन्यू पासून ते पाहुण्यांच्या राहण्याच्या सोयीपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिलं होतं. 

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफबॉलिवूडसेलिब्रिटी