Join us

उर्वशी रौतेलाने आतून दाखवला तिच्या आलीशान घराचा नजारा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 08:54 IST

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत उर्वशी रौतेलाने 'होम टूर' म्हटले आहे. व्हिडीओत उर्वशी रौतेला तिचं पूर्ण घर दाखवते आणि संपूर्ण माहिती देते.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. ती तिच्या रील आणि रिअल लाइफबाबतच्या गोष्टी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून ज्यात तिने तिच्या घराचा व्हर्चुअल टूर आपल्या फॉलोअर्सना करवला आहे. व्हिडीओमध्ये ती आलीशान घर दाखवत हे सांगत आहे की, ती यूएईमध्ये कुठे राहते. 

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत उर्वशी रौतेलाने 'होम टूर' म्हटले आहे. व्हिडीओत उर्वशी रौतेला तिचं पूर्ण घर दाखवते आणि संपूर्ण माहिती देते. या व्हिडीओची सुरूवात तिने एन्ट्रंस पॉइंटपासून केली आणि नंतर ती घराचं डिझाइन समजावत घरातील इतर रूममध्ये घेऊन जाते.

वर्साचे व्दारे डिझाइन केलेल्या या घरात फर्नीचर, कटलरी, प्लाट्स आणि जवळपास सगळंच आलीशान आहे. उर्वशीने या व्हिडीओत लिविंग रूमशी संबंधित बाल्कनीही दाखवली. जेथून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.

या होम टूर व्हिडीओमध्ये उर्वशीने सांगितले की, तिला कशाप्रकारे बुश प्लान्ट्स आणि झाडी फार जास्त आवडतात. या सुंदर घरातील जास्तीत जास्त डिझाइन ऑफ-व्हाइट आणि वार्म स्कीममध्ये आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अखेरची 'पागलपंती' सिनेमात दिसली होती. ती या सिनेमात अनिल कपूर, जॉन अब्राहमसारख्या स्टार्ससोबत दिसली होती. 

टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूडसोशल मीडिया