Join us

'यंदाच्या व्हॅलेंटाईनला गर्लफ्रेंड मिळून जाईल...', उर्वशीनं पापाराझींना दिला आशीर्वाद, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 14:03 IST

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं आहे.  तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी चाहत्यांना फिदा करत असते. उर्वशी ही सेलिब्रिटींना कव्हर करणारे पापाराझी फोटोग्राफर्सचीही आवडीची आहे. ती नेहमीच फोटोग्राफर्ससोबत आदराने बोलते.  नुकतंच मुंबई विमानतळावर उर्वशी  स्पॉट झाली. यावेळी तिला पापाराझीनं फोटोसाठी घेरलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

उर्वशी यावेळी तिच्या ग्‍लॅमरस लूकसोबत विमानतळावर स्पॉट झाली. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. उर्वशीला पाहताचं पापाराझींनी तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी तिने पापराझींशी गप्पा मारल्या. तिनं व्हॅलेंटाईनच्या पापाराझींना शुभेच्छा दिल्या. यावेळी एका पापाराझीने गर्लफ्रेंड नसल्याचं म्हटलं. तर उर्वशी म्हणाली, 'माझा आशिर्वाद आहे यंदाच्या व्हॅलेंटाईनला गर्लफ्रेंड मिळून जाईल'. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

उर्वशी रौतेलासोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या तिच्या सिनेमांच प्रमाण कमी असले तरीही ती सातत्याने सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या भेटीला येत असते. उर्वशी तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तिने शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्वशी रौतेलाने 23 ऑगस्ट 2023 रोजी 'क्रिकेट वर्ल्ड कप 2023' च्या ट्रॉफीचे अनावरण केलं. असं करणारी उर्वशी पहिली अभिनेत्री ठरली होती. सध्या चाहते तिच्या नव्य सिनेमाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :उर्वशी रौतेलासेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया