Join us

Video: उर्वशी रौतेलाने असं खाल्लं बनारसी पान की बघणारे बघतच राहिले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 13:19 IST

उर्वशीने तिचा हा लेटेस्ट व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. पण पान खातानाही कुणी इतकं ग्लॅमरस दिसू शकतं हेच उर्वशीच्या या व्हिडीओतून दिसून येतं.

उर्वशी रौतेलासोशल मीडियावर सुपर अॅक्टिव राहते आणि सतत फॅन्ससाठी खास फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच उर्वशीने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे ती यात बनारसी पान खाताना दिसत आहे. सामान्यपणे मुलींना असं पान खांताना बघायला मिळत नाही.

उर्वशीने तिचा हा लेटेस्ट व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. पण पान खातानाही कुणी इतकं ग्लॅमरस दिसू शकतं हेच उर्वशीच्या या व्हिडीओतून दिसून येतं. या व्हिडीओत ती वेडं-वाकडं तोंड करत पान खाताना दिसत आहे.

या व्हिडीओत उर्वशी रौतेलाने महानायक अमिताभ बच्चन यांना टॅग केलंय. बिग बींना टॅग करत उर्वशीने लिहिेले की 'बनारसी पान स्पेशल खाणार का जी? या व्हिडीओतील उर्वशीचा वेगळा अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच आवडला आहे. 

उर्वशी यात त्याचप्रमाणे तोंड करत आहे ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन हे 'डॉन' सिनेमातील 'खइके पान बनारस वाला' गाण्यात केलं होतं. यात उर्वशीच्या हातातील प्लेटमध्ये भरपूर पानं दिसत आहेत. उर्वशीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूडसोशल मीडिया