Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाना पाटेकरांचं खरं नाव तुम्हाला माहितीये का? आजपर्यंत अनेकांना नव्हतं ठावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 07:52 IST

Nana patekar: आज संपूर्ण सिनेसृष्टी अभिनेत्याला नाना याच नावाने ओळखते परंतु, त्यांचं खरं नाव हे नाही.

मराठी ते बॉलिवूड असा प्रवास करत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता म्हणजे नाना पाटेकर. आजवरच्या कारकिर्दीत नानांनी अनेक सुपरहिट सिनेमा कलाविश्वाला दिले. त्यामुळे सिनेसृष्टीमध्ये त्यांचं नाव कायम आदराने घेतलं जातं. नाना लवकरच द वॅक्सिन वॉर या आगामी सिनेमात झळकणार आहेत. त्यामुळे ते सध्या चर्चेत येत आहेत. यामध्येच नानांच्या नावाविषयी एक सत्य समोर आलं आहे.

आज संपूर्ण सिनेसृष्टी अभिनेत्याला नाना याच नावाने ओळखते परंतु, त्यांचं खरं नाव हे नाही. विशेष म्हणजे ही गोष्ट फार मोजक्या लोकांना ठावूक आहे. नाना पाटेकर मूळचे मुरुड-जंजीरा येथले. १ जानेवारी १९५१ मध्ये त्यांचा जन्म झाला. नानांचे वडील चित्रकार होते. त्यामुळे नानांमध्येही ती कला आपोआप रुजली. शालेय शिक्षण झाल्यानंतर नानांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांचा संबंध नाटकाशी आला आणि ते रंगभूमीवर काम करु लागले. परंतु, नानांचा हा प्रवास सोपा नव्हता.

काय आहे नानांचं खरं नाव?

आज सगळ जण नाना पाटेकर याच नावाने अभिनेत्याला ओळखतात. परंतु, त्यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर असं आहे. जन्माच्या वेळी त्यांचं नाव विश्वनाथ ठेवण्यात आलं होतं. परंतु, कालांतराने घरातील व्यक्तींसह मित्रपरिवार सगळेच त्यांना नाना म्हणू लागले. त्यांचं हेच नाव पुढे कलाविश्वातही प्रसिद्ध झालं.दरम्यान, नाना लवकरच द वॅक्सिन वॉर या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात नानांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आय.सी.एम.आर) माजी महासंचालक बलराम भार्गव यांची भूमिका साकारली आहे. सिनेमामुळे नाना सध्या चर्चेत आहेत. 

टॅग्स :नाना पाटेकरसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड