Join us

बॉक्स ऑफिसवर भिडणार 'डंकी' vs 'सालार', कोणात आहे दम; ट्रेड अ‍ॅनालिस्ट म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:03 IST

प्रभासचा 'सालार' आणि  शाहरुख खानचा 'डंकी' या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये काटे की टक्कर होणार हे नक्की झालयं. 

येत्या डिसेंबरमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल. पण प्रभास आणि शाहरुख मात्र आमने-सामने येणार आहेत. प्रभासचा 'सालार' आणि  शाहरुख खानचा 'डंकी' एकाच दिवशी अर्थात  22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन मोठ्या चित्रपटांमध्ये काटे की टक्कर होणार हे नक्की झालयं. 

शाहरुख सध्या ‘जवान’ मुळे तुफान चर्चेत आहे. 'जवान'नंतर शाहरुख खान 'डंकी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी खुपच उत्सूक आहेत. शाहरुखचा हा चित्रपट येत्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. तर प्रभासचा  'सालार'  ही 22 डिसेंबर 2023 रोजीच प्रदर्शित होणार आहे. म्हजेच दोन्ही स्टार्समध्ये काटे की टक्कर पाहायला मिळेल. 

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार,  ट्रेड अ‍ॅनालिस्ट  तरण आदर्श यांनी सांगितले की, 'सलार' आणि  'डंकी' एकाच वेळी रिलीज झाल्याने दोन्ही चित्रपटांचे नुकसान होईल. दोन्ही प्रॉडक्शन हाऊसने बसून हा संघर्ष कसा टाळता येईल याचा विचार करायला हवा. 

तर ट्रेड अ‍ॅनालिस्ट अक्षय राठी यांच्या मते, संघर्ष झाल्यास दोन्ही चित्रपटांचे १०० कोटींहून अधिक नुकसान होईल. तर मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरचे मालक आणि प्रसिद्ध प्रदर्शक मनोज देसाई म्हणाले की, दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून एकमेकांशी बोलून मार्ग काढला पाहिजे.

दरम्यान,  2018 च्या सुरुवातीला शाहरुख खानचा झिरो चित्रपटाची यशच्या KGF चित्रपटासोबत टक्कर झाली होती. तेव्हा मात्र यात शाहरुखचा 'झिरो' बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप गेला. तर 'केजीएफ'ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले होते.

शाहरुख आणि प्रभास दोन्ही मोठे सुपरस्टार्स आहेत. दोघांचाही चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, परदेशातही पाहायला मिळतात. शाहरुखच्या डंकीकडून प्रेक्षकांना चांगल्या अपेक्षा आहेत. तर दुसरीकडे प्रभासचे मागील काही सिनेमे काही खास कमाल करु शकलेले नाहीत. त्यामुळे आता त्याचा सालार चित्रपट काय कमाल करतो याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :शाहरुख खानप्रभासबॉलिवूडTollywoodसिनेमा