Join us

बच्चन हाऊसमध्ये झालेली ती एक मिटींग अन् त्यानंतर कायमस्वरुपी विभक्त झाले रेखा-अमिताभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 19:04 IST

rekha-amitabh love story: रेखा आणि अमिताभ विभक्त होण्यापूर्वी जया बच्चनने रेखाची भेट घेतली होती.

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि रेखा (Amitabh Bachchan and Rekha) यांची लव्हस्टोरी कोणापासूनही लपलेली नाही. या दोघांमध्येही सिक्रेट प्रेम होतं असं कायम म्हटलं जातं. इतकंच नाही तर आजही या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले की ते उत्तर देताना टाळाटाळ करतात. त्यामुळे या दोघांच्या प्रेमाविषयी, त्यांच्या ब्रेकअपविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळेच या दोघांच्या प्रेमाचा अंत कसा झाला किंवा ही जोडी नेमकी कशामुळे विभक्त झाली हे जाणून घेऊयात. सूत्रांच्या माहितीनुसार, रेखा आणि अमिताभ विभक्त होण्यापूर्वी जया बच्चनने (Jaya Bachchan) रेखाची भेट घेतली होती.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांची लव्हस्टोरी फार रंजक असल्याचं म्हटलं जातं. ज्यावेळी या दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली तेव्हा अमिताभ यांचं जया बच्चन यांच्यासोबत लग्न झालं होतं. परंतु, एका चित्रपटादरम्यान, रेखा आणि अमिताभ यांच्यातील जवळीकता वाढू लागली होती. इतकंच नाही तर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनीही जोर धरला होता. परंतु,त्यांची सिक्रेट लव्हस्टोरी फार काळ टिकली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, जया बच्चनने ती टिकून दिली नाही.

बच्चन हाऊसमध्ये झाली जया-रेखाची मिटींग

रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा सुरु असतांनाच एक दिवस जया बच्चन यांनी रेखाला त्यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. विशेष म्हणजे रेखानेदेखील मोठ्या हिमतीने या निमंत्रणाचा मान राखत जयाची भेट घेण्यासाठी गेली. त्यादिवशी बच्चन हाऊसमध्ये रेखा आणि जया यांनी एकत्र डिनर केलं. या डिनरमध्ये त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या. मात्र, यात अमिताभचा जराही उल्लेख झाला नव्हता. परंतु, डिनर झाल्यानंतर जया, रेखाला दरवाजापर्यंत सोडायला आली त्यावेळी तिने रेखाला सुचनावजा सल्ला दिला.

काय म्हणाल्या जया बच्चन

रेखाला निरोप देतांना मी अमिताभला कधीच सोडणार नाही, असं जया बच्चन यांनी ठणकावून सांगितलं. त्यानंतर रेखा थक्क झाली आणि तिला जे समजायचं होतं ते समजलं. परंतु, त्या दिवसानंतर रेखा आणि अमिताभ यांची पुन्हा कधीच भेट झाली नाही. या दोघांनीही विभक्त होणं पसंत केलं. मात्र, रेखा आणि अमिताभ यांच्या रिलेशन आणि ब्रेकअपविषयी अनेक स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. परंतु, त्यातील नेमकी कोणती खरी स्टोरी कोणती, सत्य काय हे कोडं अद्यापही कोणाला उकललेलं नाही. 

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चनजया बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा