Join us
Daily Top 2Weekly Top 5

3 idiots फेम अखिल मिश्रांचं ६ महिन्यांपूर्वीच निधन, पत्नी सुझैनला मिळाला नवा जोडीदार; पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 18:57 IST

सुझैन बर्नर्ट पुन्हा प्रेमात पडली असून तिने सोशल मीडियावर प्रेमाची कबुलीही दिली आहे.

थ्री इ़डियट्स सिनेमातील दुबे लायब्ररीयन म्हणजेच अभिनेते अखिल मिश्रा (Akhil Mishra)  यांचं गेल्या वर्षीत निधन झालं. घरातच स्टुलावरुन पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी सुझान बर्नर्ट जी त्यावेळी घरी नव्हती तिला नंतर बातमी ऐकून मोठा धक्का बसला. तिने पतीसाठी भावूक पोस्टही लिहिली होती. आता सुझान पु्हा प्रेमात पडली आहे. अर्जुन हरदास या व्यक्तीसोबतचा तिच्या कॉफी डेटचा फोटो व्हायरल झाला आहे.

सुझान बर्नर्ट (Suzanne Bernert) मूळची जर्मनची आहे पण  बऱ्याच वर्षांपासून भारतातच आहे. ती सुद्धा हिंदी अभिनेत्री आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत तिने काम केलं होतं. २००९ साली तिने अखिल मिश्रा यांच्याशी लग्न केले. पती अखिल मिश्रा यांच्या निधनानंतर आता तिला पुन्हा प्रेम मिळालं आहे. तिने सोशल मीडियावर 'बीइंग इन लव्ह' म्हणत प्रेमाची कबुलीही दिली आहे. अर्जुन हरदास या व्यक्तीला ती डेट करत आहे. अर्जुनसोबतचा फोटो पोस्ट करत तिने लिहिले, 'एका कॉफी डेटवर बरंच काही होऊ शकतं. नवीन सुरुवात.'

टाईम्स ऑफ इंडियाशी बातचीत करताना ती म्हणाली, 'अखिलच्या निधनानंतर मी कामाव्यतिरिक्त कोणालाही भेटणं बंद केलं होतं. मी घरातच वेळ घालवायचे. पण मी शेवटी स्वत:ला समजावलं आणि डिसेंबरमध्ये माझ्या एका मित्राच्या हाऊस वॉर्मिंग पार्टीसाठी दिल्लीला गेले. तिथे माझी अर्जुनशी भेट झाली. आमच्यात चांगली मैत्री झाली आणि जवळीक वाढली. आज आम्ही भावनिकरित्याही जोडले गेलो आहोत आणि आम्ही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो असंच वाटतं.' ती पुढे म्हणाली, "अर्जुनला माहित आहे की मी आज जे काही आहे ते अखिलमुळेच आहे. अखिलची जागा कोणीच घेऊ शकत नाही हेही तो जाणतो. मला अखिलला एक उत्तम अभिनेता आणि प्रेमळ माणूस म्हणूनच कायम स्मरणात ठेवायचं आहे. अर्जुन आणि मी एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत आणि आमच्यात लाँग टर्म रिलेशनशिप होईल अशी आम्हाला खात्री आहे."

सुझैन बर्नर्टने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. 'झाँसी की रानी','अशोक सम्राट'. शिवाय तिने 'नो प्रॉब्लेम','द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमातही काम केलं आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यूरिलेशनशिपबॉलिवूड