Join us

करण जोहरची ‘स्टुडंट’ तारा सुतारियाचा यु-टर्न! असा झाला ब्रेन वॉश!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 10:10 IST

करण जोहरच्या अ‍ॅकेडमीमधली नवी ‘स्टुडंट’ तारा सुतारिया हिने काही दिवसांपूर्वी कंगना राणौतची प्रशंसा केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कंगना माझी रोल मॉडेल असल्याचे ती म्हणाली. पण कंगनाला रोल मॉडेल सांगून काही दिवस होत नाही तोच, तारा बदलली.

ठळक मुद्देकरण जोहर निर्मित ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटातून तारा सुतारिया बॉलिवूड डेब्यू करतेय.

करण जोहरच्या अ‍ॅकेडमीमधली नवी ‘स्टुडंट’ तारा सुतारिया हिने काही दिवसांपूर्वी कंगना राणौतची प्रशंसा केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कंगना माझी रोल मॉडेल असल्याचे ती म्हणाली. पण कंगनाला रोल मॉडेल सांगून काही दिवस होत नाही तोच, तारा बदलली आणि अचानक यु-टर्न घेत दीपिका पादुकोण व प्रियंका चोप्रा या दोघी माझ्या रोल मॉडेल असल्याचे ती म्हणाली.

आता ताराने इतक्या लवकर कोलांटउडी का घ्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर अगदी सोपे आहे. शेवटी तारा ही करण जोहरची ‘स्टुडंट’ आहे आणि ‘स्टुडंट’ आपल्या मार्गावरून भरकटतेय म्हणल्यावर कुठला गुरु शांत बसेल. होय ना? ताराबद्दलही हेच झाले. ताराने कंगनाची स्तुती करणे करणला भावले नाही. ताजी चर्चा खरी मानाल तर, ताराच्या या वक्तव्यानंतर करण कमालीचा नाराज झाला. केवळ इतकेच नाही तर यानंतर त्याने म्हणे, ताराने अगदी कुशलतेने ब्रेन वॉश केला. त्याचाच परिणाम म्हणजे, चारच दिवसांत ताराने यु-टर्न घेतला आणि कंगनाऐवजी ती दीपिका व प्रियंकाच्या प्रेमात पडली.

आता करणने असे का करावे, याचे उत्तर तर तुम्हाला ठाऊक असेलच. होय, कंगनासोबतचा त्याचा घराणेशाहीचा वाद नको इतका गाजला होता. कंगनाने सर्वांदेखत करणला ‘मुव्ही माफिया’ म्हटले होते. यानंतर करण चांगलाच बिथरला होता. साहजिकच हा राग त्याच्या मनात कुठेतरी असणार. अशात कंगनाला आपल्याच एका ‘स्टुडंट’ने रोल मॉडेल मानणे त्याला कसे खपायचे?करण जोहर निर्मित ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटातून तारा सुतारिया बॉलिवूड डेब्यू करतेय. टायगर श्रॉफ, तारा आणि अनन्या पांडे या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत.

  

टॅग्स :तारा सुतारियाकंगना राणौतकरण जोहरस्टुडंट ऑफ द इअर 2