Join us

प्रेम, धोका अन् सूड... परफेक्ट मर्डर मिस्ट्री 'फिर आई हसीन दिलरुबा'चा ट्रेलर तुमच्या भेटीला, पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:37 IST

'पागलपन की हद तक न गुजरे वह प्यार ही कैसा...' असं म्हणत ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'पागलपन की हद तक न गुजरे वह प्यार ही कैसा...' असं म्हणत ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'हसीन दिलरुबा'चा दुसरा भाग अर्थात 'फिर आई हसीन दिलरुबा'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  काही क्षणातच हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 'हसीन दिलरुबा'च्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चाहते ट्रेलरची वाट पाहत होते. 

'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये  तापसीने अनेक बोल्ड सीन्स दिल्याचं दिसून येत आहे. चित्रपटाचे संपूर्ण कथानक हे प्रेम, रहस्य आणि त्यामधून होणारी फसवणूक याबद्दल असल्याचा प्राथमिक अंदाज चाहते बांधताना दिसत आहेत. तापसीने पुन्हा एकदा तिची जादूची कांडी फिरवल्याचं दिसत आहे. 

'हसीन दिलरुबा'च्या कथेला पुढे नेत स्टोरीमध्ये एक नवीन ट्विस्ट आणण्यात आला आहे.  यावेळी चित्रपटात काही नवीन पात्रांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात सनी कौशल आणि जिमी शेरगिल यांचा समावेश आहे. ट्रेलरमधून सनी कौशलची भूमिकाही तापसी आणि विक्रांतइतकीच महत्वाची असल्याचं दिसून येत आहे. ट्रेलर खूपच दमदार आहे. यामध्ये रोमान्ससह सस्पेन्स-थ्रिलर पाहायला मिळतोय.

'हसीन दिलरुबा'चा प्रीमियर केवळ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर जुलै २०२१ मध्ये झाला होता. आता 'फिर आयी हसीन दिलरुबा' सिनेमादेखील येत्या ९ ऑगस्टला हा Netflix वरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केले आहे. तर चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लन आहे. जसा प्रतिसाद 'हसीन दिलरुबा'ला मिळाला होता. तसंच प्रेक्षकांचं प्रेम 'फिर आयी हसीन दिलरुबा' मिळेल का, हे लवकरच स्पष्ट होईल. 

टॅग्स :तापसी पन्नूसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाविक्रांत मेसीसनी कौशलनेटफ्लिक्स