Join us

Swara Bhasker Marriage : स्वरा भास्कर अडकली लग्नबंधनात; चार वर्षे लहान सपा नेता फहाद अहमदसोबत केले कोर्ट मॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 18:12 IST

Swara Bhasker Marriage : स्वरा आणि फहादची मैत्री आंदोलनात झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

Swara Bhasker Marriage : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. स्वराने तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेला राजकीय कार्यकर्ता आणि सपा नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. स्वराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या हातावर काढलेली मेहंदी दिसत आहे. यासोबतच तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली हे सांगितले आहे.

स्वराने व्हिडिओ शेअर केला स्वरा आणि फहादची लव्हस्टोरी आंदोलनातून सुरू झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचा संदर्भ देत स्वराने व्हिडिओमध्ये असेही सांगितले की, दोघांचा पहिला सेल्फीही आंदोलनादरम्यान घेण्यात आला होता. यानंतर फहादने स्वराला बहिणीच्या लग्नात बोलावले होते, ज्याला उत्तर देताना स्वराने ट्विटरवर लिहिले होते की, मी शूट सोडून येऊ शकणार नाही, सॉरी मित्रा. मी शपथ घेते, तुझ्या लग्नाला मी नक्की येईन.

फहद अहमद हा समाजवादी पार्टी युवजन सभेचा स्टेट प्रेसिडेंट म्हणून काम पाहतो. स्वरा व्हिडीओमध्ये सांगते की, 2019 मध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा पाहिले आणि मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे, स्वरा आणि अहमदचे लग्न 6 जानेवारीला झाले आणि इतक्या दिवसांनंतर त्यांनी लग्नाचा खुलासा केला.  

टॅग्स :स्वरा भास्करलग्नसमाजवादी पार्टीबॉलिवूड