Join us

'छावा' आणि विकी कौशलबद्दल स्वरा भास्करनं पुन्हा केलं वादग्रस्त ट्वीट? स्पष्टीकरण देत म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:55 IST

अभिनेत्री स्वरा भास्कर उजव्या विचारसरणीच्यांवर भडकली.

Swara Bhaskar Viral Tweet: अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडते. यामुळेच तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. अलिकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अभिनेत्रीच्या नावाने दोन ट्विट व्हायरल झाले आहेत. ज्यातील एका ट्विटमध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) आणि 'छावा' (Chhava) चित्रपटाच्या निर्मात्यांवर नागपूर दंगल भडकवल्याचा आरोप केलाय. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने कुणाल कामराचं कौतुक करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यकर्त्यांना फटकारलं आहे. हे ट्विट व्हायरल झाले असून यावरुन वाद निर्माण झाल्या. आता या दोन्ही ट्विटवर आता स्वराची प्रतिक्रिया समोर आली आहे.

स्वरा भास्करच्या नावानं  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले  'छावा' आणि विकी कौशलबद्दलचे दोन ट्वीट मुळात तिनं केलेले नाहीत. या ट्वीटबद्दल तिनं स्पष्टीकरण दिलं आहे.  स्वराने दोन्ही व्हायरल ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तिनं लिहिलं, "उजव्या विचारसरणीकडून पसरवले जाणारे हे दोन्ही ट्विट बनावट आहेत. मी यापैकी कोणतेही ट्विट केलेले नाही. कृपया तथ्य तपासून घ्या.". पुन्हा एक ट्विट करत तिनं म्हटलं, "मूर्ख उजव्या विचारसरणीचे लोक पुन्हा तेच करायला लागलेत, जे ते चांगलं करू शकतात. खोटे फोटो आणि मीम्स पसरवणं". 

काय होतं फेक ट्विटमध्ये?

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटावर टीका करणाऱ्या ट्विटमध्ये लिहलं होतं, ""छावा' हा एक उत्तेजक चित्रपट होता. नागपूर दंगलींसाठी विकी कौशल आणि त्याचे निर्माते जबाबदार आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी". तर दुसऱ्या कुणाल कामारचं समर्थन करणाऱ्या ट्विटमध्ये लिहलं होत, "कुणाल कामराचा कॉमेडी शो हे एक आर्ट आहे. या तोडफोडीला शिंदेंचे समर्थक जबाबदार आहेत".

स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, स्वरा लवकरच 'मिसेज फलानी' या चित्रपटात दिसणार आहे. 'मिसेज फलानी'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. लवकरच रिलीज डेट जाहीर केली जाईल. 

टॅग्स :स्वरा भास्करविकी कौशल'छावा' चित्रपटएकनाथ शिंदे