Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 22:02 IST

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे. 

नवी दिल्ली - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणाचा सध्या तपास करण्यात येत असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान आता सुशांतला मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे. अद्याप या पुरस्काराची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

महिन्याभरापूर्वी कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने सुशांतला त्याच्या चित्रपटाचील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्याची बहीण श्वेता सिंह कीर्तीने त्याच्यावतीने हे प्रमाणपत्र स्वीकारलं होतं. "भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाने माझा भाऊ सुशांतला त्यांच्या सर्वांगीण योगदानाबद्दल सन्मानित केलं आहे. कॅलिफोर्निया आमच्याबरोबर आहे. तुम्हीही आहात ना?, आपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद कॅलिफोर्निया" असं ट्विट करून याबाबत श्वेता सिंह कीर्तीने सोशल मीडियावरून माहिती दिली होती. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयाने केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला समन्स बजावण्यात आला आहे. सीबीआयकडून रियाची चौकशी करण्यात येत आहे. 

कोण आहे रिया चक्रवर्ती?

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हे नाव  अचानक प्रकाशझोतात आले. सुशांत सिंग राजूपत प्रकरणात रिया मुख्य आरोपी आहे. अकिंता लोखंंडेशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतच्या आयुष्यात रियाची एंट्री झालीय.रिया चक्रवर्तीने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. 'दोबारा', 'हाफ गर्लफ्रेन्ड', 'बँक चोर' अशा अनेक चित्रपटांत ती झळकली आहे.‘मेरे डॅड की मारूती’मधून ती प्रकाशझोतात आली होती. तसेच तिच्याबाबत नेहमी क्युट अभिनेत्री असे बोलले जायचे अशीच इमेज इंडस्ट्रीत बनू नये म्हणून तिने बोल्ड फोटोशूट करत सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र रियाला हवं तसं यश बॉलिवूडमध्ये मिळाले नाही.  

महत्त्वाच्या बातम्या

८ जून रोजी सुशांतचं घर सोडण्याआधी नेमकं काय झालं होतं? रियाने दिली त्या दिवसाची डिटेल्ड माहिती!

सुशांतच्या वडिलांना कसे माहीत त्याच्या अकाऊंटमध्ये १७ कोटी रूपये आहेत? - रिया चक्रवर्ती

'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसुशांत सिंगबॉलिवूडरिया चक्रवर्तीसिनेमा