Join us

पुण्यात 'या' ठिकाणी सुरू आहे 'बॉर्डर २'चं शूटिंग, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:41 IST

पुण्यातील शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सनी देओल (Sunny Deol)  हा एक लोकप्रिय अभिनेता आहे.  अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'जाट' (Jaat Movie) मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यात त्याचा धमाकेदार अ‍ॅक्शन आवतार पाहायला मिळाला. आता चाहते सनी देओलच्या आगामी 'बॉर्डर २' (Border 2 Movie) चित्रपटाची वाट पाहात आहेत. 'बॉर्डर २' चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आलं आहे. या चित्रपटाचं शुटिंग हे पुण्यात सुरू आहे. 

सनी देओल सध्या 'बॉर्डर २' (Border 2 Movie) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.  पुण्याच्या खडकवासला येथील पुण्यातील प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये हे शुटिंग सुरु आहे. याबद्दल ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्शनं त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यानं 'बॉर्डर २'च्या स्टारकास्टचा फोटोदेखील शेअर केला आहे. ज्यात सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ दिसून आलेत. 

'बॉर्डर २'  या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करत आहेत. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता हे निर्मिते आहेत. 'बॉर्डर २'हा १९९७ मध्ये आलेल्या क्लासिक चित्रपट 'बॉर्डर'चा सिक्वेल असून या नव्या भागातून एक नवीन आणि भव्य कथा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. शूटिंगदरम्यानचे  फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी अर्थात २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सनी देओलवरूण धवनदिलजीत दोसांझअहान शेट्टीसीमारेषापुणे