Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबांना अनोखी आदरांजली! 'बॉर्डर २' सिनेमात सनी देओलने धर्मेंद्र यांच्यासाठी केली 'ही' खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:00 IST

'बॉर्डर २' पाहणाऱ्या प्रेक्षकांना सनी देओलने भावुक केलं आहे. सनीने वडील धर्मेंद्र यांना एका खास कृतीतून श्रद्धांजली दिली आहे. काय घडलंय? जाणून घ्या

सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर २' आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, पहिल्याच शोपासून या चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मात्र, चित्रपट सुरू होण्यापूर्वीच एका खास दृश्याने प्रेक्षकांना भावुक केले. सनी देओलने या चित्रपटात आपले दिवंगत वडील आणि बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांना खास अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे

धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा 'बॉर्डर २' चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा सर्व कलाकारांची नावे पडद्यावर येतात, तेव्हा सनी देओलच्या नावासोबत त्यांच्या वडिलांचे नाव दिसतं. 'सनी देओल (धर्मेंद्र का बेटा)' असं हे नाव पडद्यावर झळकतं. या गोष्टीने सिनेमागृहातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून अनेकांना भावूकही केले आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्यासाठी सनी देओलने केलेली ही खास गोष्ट पाहून सर्वजण भावुक झाले आणि त्यांनी सनीचं कौतुक केलं.

'बॉर्डर २' आपल्या ॲक्शन आणि देशभक्तीपर संवादामुळे बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. सनी देओलचा आक्रमक अवतार आणि त्याला मिळालेली वरुण धवन व दिलजीत दोसांझ यांची साथ प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या चित्रपटाने केवळ २४ तासांच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सनी देओलचा यापूर्वीचा चित्रपट 'जाट'च्या संपूर्ण कमाईच्या आकड्याला मागे टाकले आहे. यामुळे सनी देओलच्या 'बॉर्डर' या फ्रँचायझीबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. रिलीजआधीच 'बॉर्डर २' सिनेमाने ३ कोटींची कमाई केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunny Deol Honors Father Dharmendra in 'Border 2,' Fans Applaud

Web Summary : In 'Border 2,' Sunny Deol paid tribute to his father, Dharmendra, by including "Dharmendra ka Beta" with his name in the credits. This gesture deeply moved audiences. The film is already a box office success, surpassing previous records with advance bookings and strong audience reception.
टॅग्स :सनी देओलसीमारेषाधमेंद्रवरूण धवनअहान शेट्टीबॉलिवूड