Join us

"अफवाहों का 'सफर' बस यहीं तक", सनी देओलच्या 'टल्ली' व्हिडिओचं सत्य समोर; स्वत:च केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 15:48 IST

सनी देओलने व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये तो रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या खूपच चर्चेत आहे. 'गदर 2' च्या यशानंतर त्याचा भाव वधारला आहे. सनी देओलकडे आता सिनेमांची रांग लागली आहे. 'बॉर्डर 2', आमिर खानसोबत 'लाहोर 1942' या सिनेमांची घोषणा झाली आहे. दरम्यान आजच सनीचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आला. यावरुन त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. त्या व्हिडिओची सत्यता स्वत: सनीने सर्वांसमोर आणली आहे. 

सनी देओलने व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये तो रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालताना दिसत आहे. तर समोरच कॅमेरे लागलेलेही दिसत आहेत. म्हणजेच काय तर सनी पाजी सिनेमातील एका सीनचं शूट करताना दिसत आहे. जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामागचं खरं हे आहे. 'अफवाओ का सफर बस यही तक' असं त्याने लिहिलं आहे.

मुंबईतील जुहू सर्कलवरील हा व्हिडिओ आहे. यामध्ये तो नशेत चालताना दिसतोय. जवळून एक रिक्षा जाते तेव्हा तो रिक्षावाला सनीला रिक्षात बसवतो असं दिसून येतं. अखेर सनीने स्वत:च ट्वीट करत व्हिडिओमागचं सत्य सांगितलं आहे. तसंच त्याच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. सनी पाजीने कॅप्शनमधून आगामी सिनेमाची हिंट दिल्याचा चाहत्यांना अंदाज आहे. 

टॅग्स :सनी देओलबॉलिवूडसोशल मीडिया